
आष्टी (प्रतिनिधी )
दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये आपण स्पृहणीय यश प्राप्त करून गुणवंत यशवंत झाला आहात. त्यामुळे तुम्ही संस्कारीत होण्याची आवश्यकता आहे आणि आगामी अभ्यासक्रम हा अत्यंत आव्हानात्मक असल्यामुळे त्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलासराव सोनवणे यांनी केले.
आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवार दि.२९ जुन रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.विलास सोनवणे बोलत होते.यावेळी माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नवनीत कटारिया,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सौ.निर्मला सोनवणे, सौ.विद्या चव्हाण,दादासाहेब खाडे,स्वानंद थोरवे,पतसंस्थेचे कार्यकारी संचालक काकासाहेब पोकळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. विलासराव सोनवणे म्हणाले की,आपण सर्व ग्रामीण भागातील आणि सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी असून आई- वडिलांनी अत्यंत कष्ट करून आपणास शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण जे यश प्राप्त केले आहे ते स्पृहणीय असून आगामी काळात जो अभ्यासक्रम आपणासमोर येणार आहे तो अत्यंत आव्हानात्मक आहे असे सांगताना ते म्हणाले की,माझी नात सातव्या इयत्तेत आहे मी तिचा अभ्यासक्रम काय आहे ? हे पाहिल्यानंतर माझे असे लक्षात आले की,हा अभ्यासक्रम मला पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षी होता.मी ५० वर्षांपूर्वीचा एमबीबीएसचा विद्यार्थी असल्यामुळे मला या दोन्ही अभ्यासक्रमा विषयी कळते. याचाच अर्थ असा की, आज अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली असून विद्यार्थ्यांना अभ्यास करूनच स्पर्धात्मक परीक्षा आणि इतर परीक्षेमध्ये यश प्राप्त करावे लागणार आहे जो अभ्यास करतो त्याला काहीच अडचण नाही. त्याला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे कारण आपण संस्कारीत आई-वडिलांचे मुले आहोत त्यांच्या कष्टाकडे पाहूनच आपण अभ्यास करावा आणि भवितव्य निश्चित करावे गुणवंताचा सत्कार करण्यामागे इतर विद्यार्थ्यांनी त्यांचेपासून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले असून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी अडचणी सोडवण्यासाठी त्यांना या पुस्तके आणि शालेय साहित्य यांचे वाटप पतसंस्थेतर्फे वेळोवेळी झालेले आहे.पतसंस्थेच्या सभासदांचे यशस्वी पाल्यांचे सत्कार समारंभ पतसंस्थेतर्फे नेहमी आयोजित करण्यात येतात. पतसंस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते असे सांगितले. यावेळी अनंत बाबासाहेब घुमरे, सार्थक स्वानंद थोरवे,कु.उत्कर्षा बाबासाहेब नाकाडे, अविष्कार संजय दहातोंडे,आदित्य रामदास कोल्हे,कु. अंकिता प्रविण धस,
कु.आदिती सुरेश बोडखे,अक्षय एकनाथ ढोबळे,यश अशोक कराळे, भगत हरीश कैलास
कु.अपेक्षा माणिक पठाडे,ओंकार सूर्यकांत शिंदे,
कु.प्रणिती कैलास पवार,प्रेरणा भाऊसाहेब कवळे,
ओंकार संजय कचरे,ओंकार बबन कोल्हे,सार्थक संजय वर्धमाने,कु.प्रज्ञा संतोष डोके,रोहित संजय नेटके, सार्थक श्रीराम भवर, अनिकेत रावसाहेब भोजने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॕ.सोनवणे म्हणाले की,
स्पर्धेच्या युगात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च पालकांना सोसावा लागतो.इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च असतांना आपले आईवडील कोणत्या परिस्थितीतून जातात याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवल्यास मिळते.पुढे बोलतांना डॉ. सोनवणे म्हणाले,
सध्याच्या काळात अभ्यासक्रमामध्ये खुप बदल झाला आहे.स्पर्धेच्या युगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांनी आपली परिस्थितीची जाण लक्षात ठेवली पाहिजे त्यासाठी व्यासनाधिन न होता निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे.जर आपण आपलं सगळं लक्ष आपल्या भविष्याकडे दिले आणि परिस्थितीची जाणिव ठेवली तर यश नक्कीच मिळते असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद थोरवे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव काकासाहेब पोकळे यांनी मानले.
-------------------
0 टिप्पण्या