Ticker

6/recent/ticker-posts

२८ वर्षाच्या सेवाकालाने केशव बडे सर सेवानिवृत

आष्टी (प्रतिनिधी) घाटशिळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने सेवानिवृत्तीनिमित्त आज झालेल्या सेवापूर्ती समारंभात ज्येष्ठ शिक्षक केशव उद्धवराव बडे यांचा विद्यालयाच्यावतीने सपत्नीक ह्रदय सत्कार करण्यात आला.केशव उद्धवराव बडे यांनी प्रगती शिक्षण प्रसारक मंडळात बीड, नायगाव,काकडहिरा बोरगाव, सावरगाव घाट, घाटशीळ पारगाव आदी ठिकाणच्या शाळेमध्ये २८ वर्ष गणित विषयाचे अध्यापन कर्तव्य केले. आज नियत वयोमानानुसार ते निवृत्त झाले.याबद्दल घाटशिळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापक केशव बडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अनिताताई बडे यांचा विद्यालयाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा देऊन गुरुजनांचा आदर केला.प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनी कु.दिपाली सानप, प्रतीक्षा खेडकर तसेच शिक्षक आर के खेडकर,सी.एम. शिरसाट,प्रा.बी.के.मुंडे यांनी बडे सरांच्या कार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य वारभुवन यांनी सदिच्छा आणि मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना केशव बडे सर म्हणाले, मी इमोशनल नाही; पण सहकाऱ्यांच्या भव्य सत्काराने भारावलो आहे.मी सद्गदित झालो असे सांगत शाळा सोडून जाण्याने वेदना होत असून गणित सोपे करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न केला.विद्यार्थ्याप्रती सदैव मला अस्था राहील.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सेवापूर्ती समारंभाचे प्रस्ताविक प्रा.एस.ए.बटुळे यांनी तर बहारदार सूत्रसंचालनाची जबाबदारी लेखक प्रा.बिभिषण चाटे यांनी अत्यंत यशस्वीपणे पेलली.प्रा.के.एच.सय्यद यांनी आभार मानले. चौकट -------- बहारदार सूत्रसंचालनाने सेवापूर्ती समारंभात रंगत! --------------------------------
शिक्षकाने जीवन विद्यार्थ्यांसाठी अर्पण केलेले असते;एक नाहीतर अनेक शिक्षक मिळून बदल घडवू शकतात.अशा अत्यंत मौल्यवान भाषणातून मान्यवरांनी शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित केले.दरम्यान, निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांच्या भारदस्त शब्दरचनेमुळे आणि आशयाचे अंतरंग उघडण्याच्या अमोघ कौशल्यातून सेवापूर्ती समारंभ अत्यंत मधूर झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या