आष्टी (प्रतिनिधी)
दहावी परीक्षेतील उच्चतम गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल
रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. सिद्धी बिभिषण चाटे
हिचा आदी फाउंडेशन पाथर्डी यांच्यावतीने प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह प्रदान करून
सन्मान करण्यात आला.'आदी फाउंडेशन' च्या वतीने आयोजित गुणवंतांच्या या सत्कार
समारंभ सोहळ्यात पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या
हस्ते कु.सिद्धी चाटे हिचा पुरस्कार पालक अर्थात आई आदर्श शिक्षिका श्रीमती आशा
चाटे यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. यावेळी
मंचावर जि. प.सदस्य राहुलदादा राजळे,सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे,अभयकाका
आव्हाड,युपीएससी परीक्षेतील गुणवंत सौरव ढाकणे, एनडीए परीक्षेतील गुणवंत ईशांत
चितळे,बापूसाहेब भोसले,बापूनाना पाटेकर,रामकिसन चेअरमन, केशव आंधळे, संजय
टाकळकर,अंकुश कासोळे,प्रा. बिभिषण चाटे, अविनाश भापकर, मारुती चितळे, अमोल गर्जे,
मुकुंद गर्जे,शेख,भालसिंग,गव्हाणे, शिंदे आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती.
चौकट
--------

आई-वडिलांनी टाळ्या वाजवाव्यात असे जग निर्माण करा!- गणेश शिंदे
"विद्यार्थ्यांना वडिलांच्या डोळ्याची भाषा समजली पाहिजे. तुमच्या नावाने तुमचे
वडील ओळखले गेले पाहिजेत. असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुले असून मोठी स्वप्ने
पहा... आई-वडिलांना अभिमान वाटेल असे पद मिळवा.. असे सांगत संतांनी बंड पुकारले आणि
स्वतःला सिद्ध केले! ही राज्याची परंपरा आहे. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते हे
वास्तव मांडत सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी 'रडायला नाही; तर लढायला
शिका!' हा संदेश दिला. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी आई-वडिलांनी टाळ्या
वाजवाव्यात.. असे जग निर्माण करा!' असे आवाहन करत शेवटी 'काय सांगू राणी तुला गाव
सुटेना..' हे गीत सादर केले.. आणि प्रचंड टाळ्यांचा गजर करून प्रतिसाद मिळाला.
0 टिप्पण्या