Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुनिता उगले-तरटे यांचा आ.धस, माजी आ.दरेकर यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात ३८ वर्षे ६ महिने सेवा बजावून श्रीमती सुनिता उगले या नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत झाल्या. हा कार्यक्रम आष्टी येथील मोरेश्वर लॉन्समध्ये झाला. सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन व राजमाता माॕसाहेब जीजाई व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमा पूजनाने झाली. मंचावर श्रीमती सुनिता उगले यांचे मातापिता सौ.सुमन व श्री रामहरी उगले यांचा सत्कार झाला. प्रास्ताविकात श्री होगाडे सरांनी संपूर्ण सेवाकालातील प्रवास व केलेले उल्लेखनीय कार्य सांगितले.आपल्या प्रदीर्घ सेवाकालात प्रामाणिकपणाने, निष्ठेने,जबाबदारीने व एक संधी म्हणून काम केल्यास कर्तव्यपूर्तीच समाधान मिळते. त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत.याप्रसंगी अनेक वि‌द्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षिय कार्यकाळात शिक्षकांना प्रेरणा देणा-या व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी स्पर्धा परिक्षेवर भर देवून काम करुन घेणाऱ्या म्हणून उगले मॕडमचा कार्यकाल उल्लेखनिय आहे. अशा शिक्षिका, केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता उगले यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्ताने गौरखोद्‌गार आ. सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी व्यक्त केले.या प्रसंगी शरद जरे,डाॕ.भास्कर पोटघन,काठमोरे, मारुती पठाडे, श्रीमति लतिका तरटे यांनी आपल्या मनोगतात सुनिता उगले यांच्या उल्लेखनीय कार्याविषयी, कौटुंबिक व सामाजिक कामाविषयी गौरवोद्‌गार काढले. सुनिता उगले यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले. सर्वाच्या सहकायाने चांगले शैक्षणिक कार्य करता आले.प्रत्येक काम संधी म्हणून सकारात्मक विचाराने पार पाडले.नोकरीच्या कालावधीतील हा प्रवास केवळ जबाबदारी केले तर एक सुंदर आठवण म्हणून कायम स्मरणात राहील. यापुढेही आपले स्नेह,प्रेम आणि मार्गदर्शन लाभत राहो ही अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाला आई वडील सौ.सुमनाव श्री दादाहरी उगले, आ.सुरेश धस, माजी आ.साहेबराव देरेकर, सह-निबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर शरद जरे,साताराचे माजी शिक्षणाधिकारी डाॕ. भास्कर पोटघन, महानंदा दुध महासंघाच्या संचालिका सौ. प्राजक्ताताई धस, नगराध्यक्षा सौ. दिपाली जाधव (पाटोदा),गटशिक्षण अधिकारी सौ.सीमा काळे,मनोज धस, महादेव काठमोरे, विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे,महेश शिंदे,अशोक लटपटे, माजी चेअरमन सुरेश पवार,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,श्री गवारे साहेब (यवतमाळ), श्री री.टी.तावरे, संपत धोंडे, पी.वाय. काळे, गोरख सायकर, गटशिक्षणाधिकारी कायर्यालयाचे सर्व कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका नातेवाईक उपस्थित होते.यावेळी उपस्थितीतांचे माजी विद्यार्थिनी डॉ. प्रियंका पोटघन यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या