Ticker

6/recent/ticker-posts

शेतात राबते, कष्टते.... राम- लक्ष्मणाची जोडी! ......... छगन बोडखे आणि उत्तम बोडखे या बंधूंनी 'श्रमप्रतिष्ठा' मुल्ये जपले..

आष्टी (प्रतिनिधी) माणूस कुठल्याही क्षेत्रात,कितीही मोठा झाला तरी मानवी समाज व्यवस्थेची मूल्य त्याने कायम जपली पाहिजेत, असा संकेत आहे. आष्टी तालुक्यातील पत्रकारितेतील प्रगल्भ आणि शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आणि स्वावलंबी जीवन जगत उर्वरित वेळेमध्ये गावाकडे जाऊन शेतात योगदान देणाऱ्या बंधूंची " प्रेमळ कहाणी " श्रमप्रतिष्ठा हे मूल्यं जपण्याबरोबरच " प्रेरणास्थान " ही बनत आहे! छगन लक्ष्मण बोडखे आणि उत्तम लक्ष्मण बोडखे हे आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव या छोट्या गावातील बंधू आहेत.छगन बोडखे हे आपल्या शेतामध्ये प्रमाणिकपणे कष्ट, श्रम आणि घाम गाळून उदरनिर्वाह करतात तर त्यांचे लहान बंधू उत्तम बोडखे हे नामवंत वरिष्ठ पत्रकार आणि दैनिकाचे उपसंपादक आहेत. उत्तम बोडखे यांच्या सौभाग्यवती शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिका आहेत तर मुलगी शिवानी डॉक्टर, राकेश हा मुलगा शिक्षक आणि दुसरा दत्ताभाऊ हा मुलगा अभियंता व प्रेसलाईनमध्ये आहे. उत्तम बोडखे यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत सन्मानाचे स्थान आहे.किंबहुना तरीही कुठलाही बडेजाव न करता उपलब्ध वेळेमध्ये गावच्या शेतीमध्ये जाऊन मोठे बंधू छगन बोडखे यांच्या समवेत शेती कामे करण्यातून त्यांना मदत करून त्यांनी साधेपणाचे दर्शन घडवले आहे! आज रविवारी सुट्टीच्या दिवशी उत्तम बोडखे आपले बंधू छगन बोडखे यांच्या समवेत शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा तोडण्याचे काम करून त्यांच्या साधेपणा आणि " श्रमप्रतिष्ठा " या मूल्यांवर शिक्कामार्फत केला आहे. चौकट -------- राम- लक्ष्मणाची जोडी! ----------------
आज एकत्र कुटुंब पद्धतीचा अभाव दिसून येतो.अशाही परिस्थितीमध्ये आपल्या गावाकडच्या शेतीत राबराब राबणाऱ्या मोठ्या बंधुबरोबर अत्यंत प्रेमळ चांगुलपणाची भावना ठेवत त्याला सहकार्य करून आनंदी जीवन जगण्याची पद्धती बोडखे कुटुंबीयांच्या माध्यमातून प्रेरणास्थान बनवत आहे.याबाबत छगन बोडखे यांनी अत्यंत प्रांजळपणे या बाबीला दुजोरा दिला. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या