
सौ.सरस्वती माने -जाधव मॕडम यांचा जन्म दि.१ जुन १९६७ रोजी जामखेड शहरात झाला.पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जामखेड येथील जि. प.कन्या शाळेत झाले.५ वी.ते १० वी.पर्यत रयत शिक्षण संस्थेचे जामखेड येथीलच नागेश विद्यालयात झाले.११ वी.व १२ वी.जामखेड येथील ल.ना. होशिंग महाविद्यालयात झाले.त्यानंतर आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात बी.ए.ही पदवी पूर्ण केली.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.ॲड.बी. डी.हंबर्डे यांच्यामुळे सौ.सरस्वती माने- जाधव या कनिष्ठ लिपिक म्हणून दि.१ जुलै १९८५ रोजी महाविद्यालयात नेमणूक झाली.
त्यांचे लग्न दि.१८ फेब्रुवारी १९८७ रोजी प्रा.शहाजी दशरथ माने यांच्याशी झाले. त्यांना दोन कन्या आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत.मुलगी पोर्णिमा हिने साॕफ्टवेअर इंजिनियर हे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले आहे.सध्या ती संयुक्त अरब अमिराती याठिकाणी वरिष्ठ साॕफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे.दुसरी मुलगी प्रियांका हिने अनेक पद्वुत्तर पदव्या,पत्रकारिता अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या आहेत. सध्या ती पुणे याठिकाणी आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट ॲन्ड ब्युटी प्रशिक्षक म्हणून स्वतःचा व्यवसाय करत आहे.तिच्या पुण्यामध्ये तीन शाखा व आष्टीमध्ये एक शाखा आहे. मुलाने आष्टी येथीलच हंबर्डे महाविद्यालयातुन शिक्षण झाले.तो सध्या स्वतःचा व्यवसाय करत आहे.आज सौ.सरस्वती माने - जाधव मॕडम या ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर महाविद्यालयाच्या सेवेतून नियत वायोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
----------------
सतत बदल स्वीकारण्याची तयारी आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची चिकाटी मनाशी बाळगून राहिल्यामुळे सुरुवातीला जामखेड ते आष्टी बसने प्रवास एकटीने करताना घाबरून जाणाऱ्या त्या परदेश प्रवास एकटीने करून येऊ शकल्या.कधीही कोणतीही नवीन गोष्ट शिकून घेताना ज्या व्यक्तीकडून शिकून घ्यायचे आहे. ती व्यक्ती आपल्यापेक्षा लहान की मोठा हे न करता नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची लाज न बाळगता सतत नवनवीन गोष्टी शिकून घेण्याचा ध्यास मनाशी ठेवला. कामाकडे आणि कर्तव्याकडे लक्ष देत असतानाच त्यांनी त्यांचे अनेक छंदही जोपासले जसे की
" संगीत " ऐकणे आणि " योगा " करणे.अविरत योगा, प्राणायाम केल्यामुळे या ५८ व्या.वयामध्ये देखील पूर्ण निरोगी आणि सशक्त शरीर आहे.त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आलेल्या दिवसाचा
" आनंद " घेण्यासाठी त्या सतत उत्साही राहतात.खंबीर, संयमी स्वभाव असल्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक चढउतारांना सक्षमपणे त्यांनी दोन हात केले. सन २०१४ नंतर आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे नवीन अध्यक्ष श्री किशोरनाना हंबर्डे यांनी कै.बी.डी. हंबर्डेसाहेब संस्थापक यांनी लावलेल्या रोपट्याचे मोठ्या विशाल अशा वटवृक्षात रूपांतर केले.निस्वार्थपणे संस्थेचा विकास केला.याचा सौ. सरस्वती माने - जधव मॕडम यांना अध्यक्ष साहेबांच्या कर्तुत्वाचा खूप अभिमान वाटतो. श्रीमती सौ.माने मॕडम यांच्या कौटुंबिक सुखदुःखात हंबर्डेनाना यांनी त्यांना त्यांच्या सख्ख्या भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.त्यांच्या वेळेला धावून आले हे त्यांचे उपकार त्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. हे त्यांनी शाश्रूनयनाने व्यक्त केले.शुक्रवार दि.२७ जुन २०२५ रोजी आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात सकाळी ११.३० वा.सेवापूर्ती गौरव सोहळा होत आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष इंजि.किशोरनाना हंबर्डे राहणार आहेत.प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष दिलीप वर्धमाने, सचिव अतुलशेठ मेहेर,कोषाध्यक्ष डाॕ.गणेश पिसाळ, सहसचिव श्रीमती सुलभा खेडकर,सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,सेवानिवृत प्रा.शहाजी माने सर यांनी केले आहे.सौ. सरस्वती माने मॕडम यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या भविष्यातील आनंदी यशदायी जीवनासाठी त्यांचे शिष्य,सहकारी स्टाप,प्राध्यापक, प्राध्यापिकांकडुन मनापासून प्रार्थना करण्यात येत आहे.दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने सौ.सरस्वती माने मॕडम यांना सेवापुर्ती गौरव सोहळ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा...
--------------
चौकट
----------
सौ.सरस्वती माने - जाधव मॕडम यांनी गेली ४० शिक्षण क्षेत्रामध्ये मनापासून कर्तव्य सेवा केली. अनेक विद्यार्थी घडले मोठे मोठ्या पदावर त्या पोहोचू शकल्या याचे समाधान आहे. सेवानिवृत्तीनंतर मुले मुलींच्या उद्योग व्यवसायामध्ये आता आनंदी जीवन जगण्याचा मानस आहे.
---सौ.सरस्वती माने-जाधव
-------------------
0 टिप्पण्या