Ticker

6/recent/ticker-posts

भरपावसात तुटलेल्या तारा व विद्युत खांब उभे करुन गावाला सुरळीत विज पुरवठा करणारे सरपंच शिंदे,उपसरपंच पोकळे ................ सरपंच तात्या शिंदे,उपसरपंच सतिश पोकळे यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यात मागिल दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. झाडे उन्मळून पडले, विजेच्या तारा तुटल्या,विजेचे खांबही जमीनदोस्त झाल्याने अनेक गावांचा विद्युत पुरवठा बंद होता.बेलगांव गावासाठी पुरवठा करणाऱ्या मेनलाईनचा खांब कोसळला होता.गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे, उपसरपंच सतिश पोकळे यांच्यासह त्यांच्या टिमने भरपावसात चिखल तुटवत महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज यंत्रणेची दुरूस्ती पूर्ण करुन अनेक गावांचा सुरळीत वीजपुरवठा करुन दिला.सरपंच तात्या शिंदे, उपसरपंच सतिश पोकळे यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.तालुक्यातील बेलगांवाला विद्युत पुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या तारा तुटल्या. परिणामी गावे वाड्या वस्त्यांमधील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.मात्र भरपावसात महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी,गावचे सरपंच,उपसरपंच व त्यांची टिम यांनी शेतात चिखल तुडवत, अनेक धोके पत्करत वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम केले. परिणामी परिसरातील गावे, वाड्या वस्त्यांमधील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला पावसाने पूर्णतः शेतात असलेल्या मेन लाईनचा विद्युत पुरवठा करणारा खांबच कोसळला ज्याठिकाणी वीजतारा तुटल्या त्याठिकाणी जाणे अतिशय जिकरीचे होते.शेतात निसरड्या चिखलामुळे चालणे कठीण झाले होते.या प्रकाशदूतांनी भर पावसात पायदळ साधनसामग्री घेऊन जात तुटलेल्या तारा जोडण्याचे काम करुन वीज पुरवठा सुरू झाला.त्यानंतर या वीजवाहिन्यांद्वारे सर्वच घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. तत्पर ग्राहकसेवेसाठी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी झुंज देत वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या सरपंच तात्यासाहेब शिंदे, उपसरपंच सतिश पोकळे, सदस्य शिवाजी पोकळे,मारुती सरोदे,सुभाष शिंदे यांच्यासह महावितरण कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या