Ticker

6/recent/ticker-posts

शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सत्कार

आष्टी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय पातळीवर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित झालेले निसर्ग अभ्यासक, जैवविविधता संशोधक आणि वन्यजीव छायाचित्रकार रणजित रावसाहेब राऊत यांचा जामखेड येथे सन्मान करण्यात आला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात राऊत यांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक जयेश कांबळे,दत्तात्रय लोखंडे उपस्थित होते.सत्कारानंतर बोलताना रणजित राऊत यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझा नाही तर माझ्या मातृभूमीच्या जैवविविधतेचा सन्मान आहे. ग्रामीण भागातील जैवसंपत्ती, वन्यजीव आणि लोकपरंपरांचे संरक्षण हे माझे ध्येय आहे.” त्यांनी युवकांना संशोधन आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी राऊत यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील युवक जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. राऊत यांच्या कार्यातून इतर युवकांनी प्रेरणा घ्यावी.” यावेळी बोलताना समाज सेवक जयेश कांबळे म्हणाले ,मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ३० वर्षापासून समाजसेवा करताना पाहत आहे, खरोखर त्यांच्यासारखी समाजसेवा करणारी व्यक्ती मी अद्याप पाहिली नाही. कोणत्याही क्षेत्रात ते अग्रेसर कार्य करत असतात. त्यांनी २००० साली डॉ.रजनीकांत आरोळे यांच्याकडे १९९३ च्या भूकंपात सापडलेली संगीता हिचा विवाह स्वतःच्या नातेवाईकाशी लावून तिचे कल्याण केले.आमचे मामा स्व. डॉ.रजनीकांत आरोळे यांना आरोळे हॉस्पिटलसाठी ७ एकर जमीन कोठारी परिवाराने दिलेली आहे याचा आम्हाला अभिमान आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश कांबळे यांनी तर दत्तात्रय लोखंडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या