आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर
यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित सप्ताहामध्ये अ.भा.वारकरी
मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महराज बोधले यांचे काल्याचे काल्याचे
किर्तन संपन्न झाले.या कीर्तनला आष्टी तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने
उपस्थित होते. अध्यात्म सेवेला स्पर्श करत भावीक भक्तांनी टाळ मृदंग आणि विना घेऊन
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आष्टी शहरातील माऊली मंदीरात ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर
यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहातील काल्याचे कीर्तन
प्रसंगी सौ. दमयंतीताई भीमराव धोंडे आणि सौ.संगीताताई सुरेश धस यांचा सरपंच
सौ.शालनताई मुळे,माजी सरपंच सौ. आदिकाताई लोखंडे, सौ. बिडवेताई यांनी संत माऊली
चाकरवाडीकर यांच्या प्रतिमा देऊन सत्कार केला. माऊलीदादांच्या २५ प्रतिमा सरपंच
परिवंत गायकवाड यांनी संस्थानला दान केल्या आहेत.
चौकट

-------
आष्टी शहरात माऊली
मंदिरामध्ये होणाऱ्या आध्यात्मिक सेवेला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच
झालेल्या ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला
भाविक भक्तांची झालेली उपस्थिती खऱ्या अर्थाने चिरंतन सुख समृद्धीचा ठेवा असल्याचे
स्पष्ट झाले.
0 टिप्पण्या