Ticker

6/recent/ticker-posts

माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते सार्थक थोरवेचा गौरव

आष्टी (प्रतिनिधी) राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्यावतीने ४ मे रोजी घेण्यातआलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल सार्थक स्वानंद थोरवे यांचा महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.नीट २०२५ च्या परीक्षेत ५८५ गुण मिळवत संपूर्ण देशातून २८२१ वा. क्रमांक मिळवला आहे. सार्थक थोरवे यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करीत टेमकर यांनी सार्थकला वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सार्थक थोरवेचे प्राथमिक शिक्षण आष्टी येथील जि.प. प्रा.शा.नं.१ मध्ये झाले आहे. माध्यमिक शिक्षण श्री गणेश विद्यालयात झाले.पुढे चाचणी परीक्षेतून त्यांची निवड लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात झाली.बारावी बोर्ड परीक्षेत त्याने ९२.१७ टक्के गुण मिळवले.नुकत्याच नीट परीक्षेच्या निकालात अतिशय चांगले यश संपादन केले.याप्रसंगी माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.सार्थक थोरवे हा बीड जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांचा नातू आहे.सार्थकचे आई वडील शिक्षक आहेत.यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे,माजी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे,[माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले,उप शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे,कक्ष अधिकारी प्राथमिक अनंत खेडकर,पत्रकार उत्तम बोडखे, माजी सरपंच नामदेव राऊत, डाॕ.अशोक गांधी,संतोषशेठ मेहेर,सुरेश पवार,प्रल्हाद पोकळे,सुधीर पोकळे, दत्ताभाऊ काकडे,पी.वाय. काळे,संपत धोंडे,पोपट घुले, नितीन करडुले,प्रविण मेहरकर, शिवाजी पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या