Ticker

6/recent/ticker-posts

संतांचे चिंतन शाश्वत आनंदाची निर्मिती करते ........ सुभाष चव्हाण

आष्टी ( प्रतिनिधी ) , संतांनी समता बंधुत्व ऐक्य सर्वधर्मसमभाव या तत्वांची निर्मिती समाज व्यवस्थेमध्ये मूल्य रुजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.विविध जाती धर्म पंथातील संत हे मूल्य निर्मिती करणारे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत असे सांगून संतांच्या विचार कार्यांचे चिंतन हे मनुष्याला शाश्वत आनंदाची निर्मिती करतात असे भावोद्गार सामाजिक कार्यकर्ते तथा धार्मिक सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ सुभाष चव्हाण यांनी काढले. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर देहू आळंदी छत्रपती संभाजीनगर बीड आदी सह विविध भागातून भाविक भक्तांच्या अथांग सागराचे कौतुक करत अत्यंत पवित्र दिनी संतांचा थोर महिमा या अनुषंगाने माध्यमांशी ते बोलत होते.संतांनी भक्तीचा मार्ग दाखवला. मानवी जीवन अलौकिक असून मुल्य निर्मितीवर जीवन जगल्यास शास्वत आनंदाची निर्मिती होतेच; त्याबरोबरच सुख समृद्धी आणि शाश्वत समाधानाची उपलब्ध होते. विविध जाती धर्म पंथातील संतांनी सांगितलेला अध्यात्म व भक्तीचा मार्ग हाच खरा शाश्वत मार्ग असून या मार्गावर चालल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखकर होऊ शकते असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. चौकट -------- संत विचारांचा अलौकिक महिमा ----------------------- संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ महाराज,संत सेवालाल महाराज,संत भगवान बाबा, संत चोखामेळा,संत सावतामाळी, संत गोरा कुंभार आदी सह संतांनी समता बंधुत्व आणि ऐक्याची निर्मिती केली. अभंग ओवी आणि लिळांमधून त्यांनी निर्मिती केलेले शब्द चंद्र सूर्य असेपर्यंत मानवी जीवनाला मार्गदर्शन करतील असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यात्म शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या