
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे व सौ.सुमनताई पोकळे यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस थाटात झाला. आता या दोघांचा शतकपुर्ती सोहळा ही आपण थाटात साजरा करु. पोकळे सर व त्यांचे मोठे बंधु काॕ. नानासाहेब पोकळे यांनी कुटुंबातील सर्व सदस्य उच्चशिक्षीत व उच्चपदस्थ केलेले आहेत.जावई , पुतणे,मुलगा,सुना हे मोठ मोठ्या पदावर कार्यरतआहेत.त्यांनी डिवायएसपी,कृषी संचालक, शिक्षक, शिक्षीका,वकील आदी घडविले आहेत.त्यामुळे सौ.सुमनताई व विक्रम पोकळे यांची शतकपुर्ती थाटात साजरी व्हावी असे प्रतिपादन ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी केले.बीड जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांचा सुवर्णमहोत्सवी लग्नवाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल,ह.भ.प. दादा महाराज चांगुणे,सेवानिवृत शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अरुण धामणे, लक्ष्मण पोले, भगवान सोनवणे, अनंत खेडकर, शिवाजी शिंदे, दत्ताभाऊ काकडे, संतोषशेठ मेहेर, डाॕ.अशोक गांधी, जय देशमुख, नामदेव राऊत, रामराव झांजे, प्रल्हाद पोकळे, सुधीर पोकळे, स्वानंद थोरवे,उत्तम बोडखे,सुभाष रासकर,पोपट घुले, प्रा.डाॕ.शाम सांगळे, शिवाजी कर्डीले, नवीन कासवा, नवनाथ विधाते, पी.वाय.काळे,संपत धोंडे,तान्हाजी भगत,दिलीप पोकळे,सिध्देश्वर शेंडगे,राजेंद्र लाड, प्रा.अमृत पोकळे, सरपंच सजय थोरवे, सरपंच अर्चना मनोज थोरवे, बलभीम थोरवे महाराज,बाळासाहेब शेंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले की,विक्रम पोकळे सर हे एक आगळे वेगळे रसायन आहे. माणुसकी, श्रमप्रतिष्ठा, चांगुलपणा,सत्य, कष्ट,प्रामाणिकपणा ही मूल्य जपणारे ते व्यक्तिमत्व आहे. विक्रम पोकळे साहेबांशी माझा असलेला सहवास हे माझे भाग्य आहे. यावेळी त्यांच्या विविध अंगी व्यक्तिमत्त्वावर संक्षिप्त प्रकाश टाकला.विक्रम पोकळे यांनी शिक्षण अधिकारी पदावर असताना जनसामान्यांच्या सेवेत आदरभाव ठेवला.शिक्षण क्षेत्राची मनोभावे सेवा केली.या काळात त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अत्यंत स्नेहाचे संबंध ठेवले हे संबंध आजही कायम असल्याचे सांगून अनेक त्यांनी उदाहरणे त्यांनी दिले.बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांचा लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रवर्य आणि नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. दरम्यान विक्रम पोकळे यांच्या कुटुंबीयांना सुख समृद्धी आनंद आणि दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करून त्यांनी उभयतांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित पोकळे,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, माजी सरपंच नामदेव राऊत,सुधीर पोकळे,प्रल्हाद पोकळे,स्वानंद थोरवे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन स्वानंद थोरवे तर आभार अमित पोकळे यांनी मानले.
-----------------
0 टिप्पण्या