Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट सूत्रसंचालन कौशल्याचे कौतुक ........... प्रा.बिभिषण चाटे यांचा निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण केंद्रात गौरव*

आष्टी (प्रतिनिधी) "कार्यक्रमाचा आशय.. नेमकेपणाने पोहोचवणारी विशेष शैली... कार्यक्रमातील भागांची गुंफण करण्याचे कौशल्य.. आणि निवेदनातील परिणामकारकता या कौशल्यामुळे निवेदक तथा सूत्रसंचालक प्रा. बिभिषण चाटे यांनी प्रशिक्षणातील विविध घटक आणि कार्यक्रम तसेच उपक्रमांमध्ये चैतन्यमय सुगंध निर्माण केला!" अशा शब्दात वरिष्ठ व निवड प्रशिक्षण केंद्राचे विभाग प्रमुख तथा शिक्षण तज्ञ राम सालगुडे आणि वरिष्ठ सुलभक डॉ.सिराजखान पठाण यांनी गौरव केला. महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत बीड येथील केएसपीएम विद्यालयाच्या भव्य इमारतीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण-२०२५ दिनांक 2 जून ते 12 जून 2025 या कालावधीत संपन्न झाले. गुरुवारी प्रशिक्षणाचा निरोप समारंभ संपन्न झाला.उत्कृष्ट निवेदन करत निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांनी कार्यक्रमात उत्साह आणि रंगत आणली. त्यांनी प्रशिक्षणात गेल्या दहा दिवस ही उत्कृष्ट निवेदनाचे कौशल्य सांभाळल्याने वरिष्ठ सुलभक आणि प्रशिक्षणार्थीनी कौतुक केले. प्रशिक्षणातील सर्व ध्येय, उद्देश,घटकांच्या अनुषंगाने सुलभाकांनी केलेले मार्गदर्शन, दरम्यान अभ्यास, नियोजन, क्रम निश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे, समीक्षण, रसग्रहण या सर्व मूल्यांना सांभाळून त्यांनी प्रशिक्षणात चैतन्यमय रूची निर्माण केली. याबद्दल केंद्रप्रमुख डॉ.विक्रम सारूक यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख राम सालगुडे सर, ज्येष्ठ सुलभक डॉ.सिराजखान पठाण, सुलभक श्रीमती मनीषाताई जाधव, सुलभक श्रीमती कमलाक्षी देशमुख, खदीरा शेख यांनी भाषणातून कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ प्रशिक्षणार्थी प्रा. अर्जुन मासाळ, प्रा.रवीदादा चौधरी, प्रा. फुलचंद ठोंबरे, प्रा.किरण मदुरे, प्रा.उमाकांत जगताप, प्रा. दयानंद सरपते, प्रा.कल्याण जायगुडे,प्रा.रवी शिंदे, प्रा.सुरजकुमार मुंडे, प्रा. विजय रायकर, श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती कदम मॅडम, श्रीमती नीता झगडे, श्रीमती शेख मॅडम, प्रा. बप्पासाहेब फाळके, प्रा. राजेंद्र डांगे, प्रा.शहाजी आटोळे, प्रा. गुठे, प्रा. डॉ. आत्माराम झिंजुर्डे, प्रा. चंद्रकांत चाळक, प्रा. गणेश येवले, प्रा. सोळंके, प्रा. साहेबराव राठोड, प्रा. मांदळे,प्रा.गुंजाळ आदीसह सर्व प्रशिक्षणार्थी यांनी कौतुक केले. प्रा. विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले. चौकट --------- *राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व अभ्यासक्रम आराखड्याचा परिचय* प्रशिक्षणात प्रत्येक दिवशी पाच सत्रात अध्ययन निष्पत्ती नुसार विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सूत्रसंचालनामुळे उपक्रम बहारदार झाले. निवेदनातील परिणामकारकता, योग्य गुंफण, नेमकी शैली यामुळे कार्यक्रम सुंदर नेटका आणि अप्रतिम होण्यास मदत झाली. प्रशिक्षणामध्ये ही किमया प्रा. बिभिषण चाटे यांनी पेलल्यामुळे ज्येष्ठ सुलभक डॉ.सिराज खान पठाण यांनी विशेष गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या