Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्यूष फुलचंद ठोंबरे यास नीट परीक्षेत ५७० गुण

आष्टी (प्रतिनिधी) प्रत्युष फुलचंद ठोंबरे या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या डॉक्टर होण्यासाठीच्या नीट परीक्षेत ५७० गुण घेत डॉक्टर होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.दरम्यान,या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.प्रत्युष ठोंबरे हा रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.फुलचंद भीकचंद ठोंबरे यांचा मुलगा असून आई सौ.वंदना फुलचंद ठोंबरे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत.प्रत्युष याने लातूर येथे प्रचंड मेहनत घेऊन पहिल्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. त्याचा एनटी डी मधून देशात २००० क्रमांक असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा नीट परीक्षेची काठीण्य पातळी अत्यंत तीव्र असल्याच्या देशभरात चर्चा होत्या.या यशाबद्दल त्याचे वडील प्रा.फुलचंद ठोंबरे,आई वंदना ठोंबरे,आजोबा भिकचंद ठोंबरे,आजी पद्मिनी ठोंबरे नातेवाईक मित्रमंडळी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या