आष्टी (प्रतिनिधी)
ध्येय,उद्दिष्ट आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी समस्या यांचा वेध
घेत सुलभक आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवस चाललेल्या निवड श्रेणी
प्रशिक्षणामध्ये अत्यंत मनःपूर्वक अध्ययन अध्यापन क्रिया पार पडली. दरम्यान, निरोपा
च्या प्रसंगी इंग्रजी मराठी शब्दांच्या अंताक्षरीने तसेच हिंदी मराठी गीतांच्या
सदाबहार साथीने निवड श्रेणीचे प्रशिक्षण बहारदार झाले. बीड येथे २ ते १२ जून २०२५
या दरम्यान के एसपीएम विद्यालयाच्या भव्य इमारतीत वरिष्ठ व निवड श्रेणी चे
प्रशिक्षण मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पार पडले.१२ जून २०२५ गुरुवारी या
प्रशिक्षणाचा समारोप झाला यावेळी निवड श्रेणीच्या उच्च माध्यमिक कक्षामध्ये निरोप
समारंभात मार्गदर्शक झाले दरम्यान इंग्रजी मराठी आणि मराठी हिंदी चित्रपटांच्या
गीतांची अंताक्षरी सदाबहार वातावरणात पार पडली.यात विविध प्राध्यापक प्रशिक्षणार्थी
बांधवांनी सहभाग घेतला. अत्यंत अवघड शब्दरचना ज्ञानदानाच्या अनेक महत्त्वाच्या बाबी
यांना स्पर्श करत सदाबहार हिंदी मराठी गीतावर सुंदर आवाजात गायकी करणारे प्रा.किरण
मधुरे,प्रा. ठोंबरे आणि प्राध्यापक मांदळे सर या अंताक्षरी स्पर्धेतील " मॅन ऑफ द
मॅच " ठरले ही घोषणा सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांनी
करताच कक्षातील सबंध प्रशिक्षणार्थींनी प्रचंड टाळ्यांचा गजर करत त्यांचे स्वागत
केले.केंद्रप्रमुख डॉ. विक्रम सारूक,विभाग प्रमुख सुलभक श्रीमती मनीषाताई जाधव
डॉ.सिराजखान पठाण, श्रीमती देशमुख,श्रीमती खदीरा, शेख मॅडम यांनी सर्व
प्रशिक्षणार्थींच्या या गुण कौशल्याचे कौतुक केले.
चौकट
---------
मनोरंजनातून
ज्ञान कक्षा रुंदावल्या!
------------------------------

महाराष्ट्र राज्य शिक्षण व
प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत बीड येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी
प्रशिक्षणामध्ये नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने व्यापक चर्चासत्र पार पडले दरम्यान
उच्च माध्यमिक च्या निवड श्रेणी कक्षामध्ये संपन्न झालेल्या अंताक्षरी स्पर्धेत
दोन्ही गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.अंतिम क्षणी मनोरंजनातून अंताक्षरीने
ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यास मदत झाल्याचे सुलभक श्रीमती मनीषाताई जाधव म्हणाल्या.
0 टिप्पण्या