Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते मुंडेसाहेब वारकऱ्यांना वारकरी दिसत,साधकाला ते मायबाप तर अनाथला ते नाथ दिसत होते .......... रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज

उत्तम बोडखे ---------- गोपीनाथगड-परळी ---------------
कर्माला कुणालाही चुकविता येत नाही.देव,दानव व मानव यांनाही कर्म चुकलेले नाही. तुम्ही कुठेही आणि कितीही पळा,कुठेही जा कर्म भोगावेच लागते.कर्म हे भोगुनच संपवावे लागत असते. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केलेले आहे. गोपीनाथराव मुंडे जाऊन १० वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही.गोपीनाथराव मुंडे हे अनाथाचे नाथ होते.लोकनेते मुंडेसाहेब वारकऱ्यांना वारकरी दिसत,साधकाला ते मायबाप तर अनाथला ते नाथ दिसत होते असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले. परळी वै. तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर भाजपचे राष्ट्रीय नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ११.व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे,माजी खा.डाॕ. प्रीतमताई मुंडे, श्रीमती प्रज्ञाताई मुंडे,आ.धनंजय मुंडे, आर्यमन पालवे,आ. नमिताताई मुदंडा, आ.विठ्ठलराव लंघे, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ.बदामराव पंडीत,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,गोदवरीताई मुंडे,ओबीसी नेते लक्ष्मण हाके,अक्षय मुदंडा,ह.भ.प. पानेगावकर महाराज,राजाभाऊ मुंडे,सुशिला मोरोळे, लालाभाऊ कुमकर, दादासाहेब मुंडे, विजय गोल्हार, कल्याण आखाडे, सर्जेराव तांदळे, संदीप उबाळे,दिनेश ढेंगे,बन्शीभाऊ सिरसाट,संतोष हांगे,रामराम खेडकर,रामदास बडे,एन.एम.बडे, किशोर खोले, भोसले,अनिल जायभाये, उपसभापती पांडुरंग नागरगोजे,संदीप नागरगोजे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज पुढे म्हणाले की,जन्म हा पर्वत, जीवन रुपी नदी, सुख व दुःख या जीवनरुपी नदीचे दोन किनारे आणि मरण हा समुद्र आहे.जन्मभर जीवनात दुःखाचे डोंगर असतात. दुःखाची भिती वाटत असते परंतु जीवन हे समाधानी वृत्तीने जगत रहावे. विज मानव निर्मित आहे.ती वेगवेगळ्या प्रकारचे काम करते.माणसाने निर्माण केलेली विज जर इतके कामे करीत असेल तर माणसाला निर्माण करणारा देवा किती श्रेष्ठ असेल याची कल्पना न केलेलीच बरी असे ते म्हणाले.रथी, महारथी, अतिमहारथी महामहारथी याविषयावर सविस्तर विवेचन केले.माणुस स्मरण भुतकाळाचे करतो,चिंता भविष्यकाळाची करत असतो.म्हणून चिंता करु नका देवाचे चिंतन करा असेही आवाहन रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय नेते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळ पासूनच गोपीनाथगडावर अलोट गर्दी झाली होती.११ व्या. स्मृतिदिना निमित्त आयोजित समारंभास रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली. गोपीनाथगडावर अलोट गर्दी झाली होती.हरिनामाच्या गजराने गोपीनाथगड दुमदुमून गेला होता.लोकनेते गोपीनाथराव मुंडे आपल्यात नसले तरी राज्याच्या मंत्री पंकजाताई व माजी खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांच्या स्वरूपात ते कायम दिसतात. संघर्षकन्या पंकजाताई मुंडे या झाशीच्या राणीसारख्या आहेत.त्यांच्या कर्तृत्वाला शक्ती मिळाली पाहिजे. सुर्योदय व सुर्यास्त या नैसर्गिक घटनासारखे प्रत्येकाचे जीवन मरण ठरलेले आहे. मात्र लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे वारकऱ्यांना ते वारकरी दिसत साधकाला ते मायबाप तर अनाथला ते नाथ दिसत होते अशा शब्दात रामायणाचार्य ढोक महाराज यांनी लोकनेते मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. चौकट --------- साहस,संघर्ष आणि सेवेचा त्रिवेणी संगम म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे होते.मुंडे अन महाजन यांनी भाजप बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.आज त्यांचा वारसा त्यांच्या तिन्ही मुली चालवत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे अशा शब्दांत मान्यवरांनी प्रतिक्रिया देत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ---------------- असंख्य आजी, माजी आमदार, आजी,माजी मंत्री गोपीनाथगडावर नतमस्तक --------------- महाराष्ट्र राज्यातील अनेक आजि माजी आमदार,आजी, माजी मंत्री यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेतले. दिवंगत भाजपा नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ११ व्या. स्मृतीदिनानिमित्त सकाळपासूनच गोपीनाथगडावर मुंडेप्रेमींनी गर्दी केली होती.विविध क्षेत्रातील मान्यवर गोपीनाथगडावर येऊन स्मृति दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले. चौकट ---------- तुम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना कुठे शोधता ? मला माहित नाही परंतु मी तुमच्यात मुंडे साहेबांना शोधते अशा भावना ना. पंकजाताई मुंडे यानी व्यक्त केल्या. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या