
आष्टी शहरातील एक सामाजिक जाणिव असलेले आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय व्यक्तीमत्व असलेले आष्टीचे माजी नगराध्यक्ष तथा धनश्री पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे (आण्णा)...रंगनाथ धोंडे यांचे आडाणी असलेले वडील गोपीनाथ धोंडे या माणसाकडे शिक्षणाविषयीची असलेले दुरदृष्टी,कष्टाने,नितिमत्तेने, प्रमाणिकपणाने आपले कुंटुंब प्रगतशील व्हावे अशी मनोमन भावना होती.गोपीनाथ धोंडे हे कष्टमय जीवन जगत मुलांना, मुलींना शिक्षीत करुन सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली आहे.कष्टाला पर्याय नाही.आपल्या कुटुंबाचा सामाजिक स्तर उंचवला पाहिजे अशी भावना व विचार ठेवणारे आदर्श पिता गोपीनाथ धोंडे होते.
वृक्षासोबत वाढदिवस
करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून रंगाण्णा धोंडे यांची परिसरात ओळख आहे.आष्टी, मुर्शदपूर शहरात शेकडो लावलेल्या झाडांसोबत आपला
व झाडांचा वाढदिवस साजरा करणारे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.गेल्या काही वर्षापासून स्वत:चा वाढदिवस साजरा न करता आपण लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करतात.वृक्षांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे मला मनस्वी आनंद व समाधान लाभते असे खुद्द रंगनाथ धोंडे सांगतात. कुटुंबासाठी जगायचं कसं आणि वागायचं कसं हे आण्णांना चांगलेच समजलेले व उमजलेले आहे.त्यामुळेच ते सामाजिक,राजकीय क्षेत्रात ते यशस्वी झालेले आहेत.रंगाण्णा हे आता " वडील " नावाचा वटवृक्ष बनला आहे.आण्णांचा आम्हाला कळलेला अर्थ आण्णा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,आण्णा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन.स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी (कुटुंबांसाठी) झटणारं अंतकरण..असे त्यांचे दोन्ही मुले व पत्नी आशाताई धोंडे आण्णाविषयी बोलताना सांगतात.निखिल व स्वाप्निल हे दोन मुले.दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन आर.जी. कलेक्शन व धनश्री पतसंस्थेचा कारभार पाहात आहेत.रंगाण्णा हे सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करीत असताना त्याच्या होणाऱ्या साधक बाधक परिणामांचा विचार करून त्यावर मार्ग काढत जीवन जगले.प्रत्येक प्रतिकूल प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आपल्या दैनंदिन जीवन शैलीवर त्याचा कसलाही परिणाम त्यांनी होऊ देला नाही.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर सामाजिकस्तर उंचावत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सुसंस्कृत केले. आपले संपूर्ण कुटुंब मुले
नातवंडे (मुलाचे मुले,मुली ) यांच्यात ते रमतात,नोकरीत आहेत.आष्टी शहर व परिसरात सामाजिक,राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. स्नेह,आनंद,शांतता,ऐक्यभाव निर्माण करणे व सामाजिक समस्या दूर करण्याचे सतत त्यांनी काम केले आहे परंतु चंदनाप्रमाणे झिजणारा कुंटुंबकर्ता अशी रंगनाथ धोंडे यांची प्रतिमा आहे.
आष्टी शहरातील एक कष्टाळू आणि जिद्दीने वेगवेगळे व्यवसाय करून आपले कुटुंब आदर्श निर्माण करणारे रंगाण्णा आहेत.अत्यंत बेधडकपणे कार्य करत प्रतिकूल परिस्थितीतून चिखलाच्या दलदलीतून सुंदर कमलपुष्प निर्माण करण्याची किमया आष्टी शहरातील जिगरबाज राजकीय व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष रंगनाथ धांडे यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
रंगनाथ धोंडे यांचा जन्म कृषी दिन दि.१ जुलै १९६३ मध्ये गरीब शेतकरी कुटुंबात झाला.प्राथमिक व शालेय शिक्षण आष्टी येथील जि.प. माध्यमिक मुलांचे हायस्कूलमध्ये झाले.आष्टीतच बी.ए.पर्यतच शिक्षण झाले. घरात अठराविश्व दारिद्र्य.अशा बिकट परिस्थितीतही आनंदी जीवन जगणे,शाळेला दांडी मारणे,विहिरीत पोहणे, लहानपणी दुसऱ्यांच्या झाडाचे आंबे,सिताफळ,रामफळ,लिंब,चिंचा तोडण्यापासून होळीसाठी लाकडं गोळा करणे हा आवडीचा छंद.शृंगेरीदेवीची यात्रा असो किंवा नान्नज जवळा,फक्राबादची यात्रा असो पायी जात..आणि यात्रेचा
आनंद लुटणे.दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.कॉलेजमध्ये अकरावीला असतानाच कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले.घरात ५ भाऊ, सहावी बहीण असा परिवार,४ चुलते,२० चुलतभाऊ, चुलत बहिणी असा आष्टीतील
सगळ्यात मोठा धोंडे परिवार आहे.वैवाहिक जीवनाची सुरुवात अतिशय संघर्षमय झाली.१९८६ चा तो काळ आष्टीतील पहिला आंतरजातीय प्रेमविवाह.दोन्ही परिवार,दोन्ही समाजाचा विरोध आणि त्याला सामोरं जाणं फार कठिण होतं.लग्नानंतर दोन महिने पाषाण (पुणे) वीटभट्टीवर अक्षरश:मजुरी केली पण मिळणा-या मजुरीवही स्वत: राहणे आणि सहचरिणीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न रंगनाथ धोंडे यांनी केला. जीवनाचा मार्ग अतिशय खडतर होता असे असताना पहिला मदतीचा हात दिला तो चंदुआण्णा हंबर्डे यांनी...
पुण्यातुन आष्टीत आणण्यास चंदुआण्णा हंबर्डे यांनीच प्रयत्न केला. दहावीला उत्तम गुण घेणा-या पत्नी सौ.आशाताईस शिकवावे असा सल्ला चंदूआण्णांनी दिला. अक्षरशःस्वतःमोलमजुरी,हमाली
करून पत्नीस डी.एड. शिकविणारे रंगनाथ धोंडे आहेत.ख-या अर्थाने म.फुले यांचा वसा व वारसा माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी चालविला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पुण्याहून आष्टीस येताना अहिल्यानगर पर्यंत आलो पण अहिल्यानगर हुन आष्टीला येण्यास पाच रुपये कमी पडले.अहिल्यानगरच्या स्टँन्डवर ओळखीच्या ब-याच लोकांना पैसे मागीतले पण कोणी पैसे दिले नाही.ईश्वर टकले या माणसाने ती मदत केली आणि मग आम्ही आष्टीला आलोत.आजही तो क्षण आठवला तर मन गहिवरून येतं.पत्नी सौ. आशाताई धोंडे (शिंदे) जि.प. मध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्यावर १९९० साली निखीलचा जन्म झाला.आता
पत्नीस नोकरी मिळाल्यानंतर किमान गरजा भागणार होत्या.
१९९२ साली स्वप्निलचा जन्म झाला.निखिलचे इंजिनियरिंग पर्यंतचे शिक्षण पुण्यात केले. स्वप्नीलचेही शिक्षण पुण्यातच झाले.स्वप्नील बीबीए झाला आहे.मोठया सुनबाई सौ. दमयंती ही बी.ई.झाली आहे. धाकट्या सुनबाई सौ.पल्लवी बी. एस्सी.पर्यंत शिकलेल्या आहेत.ती आष्टी शहराची माजी नगराध्यक्षा आहे.आज्ञाधारक मुलं,सुसंस्कारी सुना आणि दोन गोड नाती असा परिवार आहे. घरात गोकुळातील सुख आहे. रंगनाथ धोंडे यांचा १९९२ पासुन सामाजिक,राजकीय प्रवास सुरू झाला आहे.आष्टी ग्रामपंचायत सदस्य,सरपंच आष्टी पंचायत समिती सदस्य ते नगरपंचायत निवडणुकीत आजपर्यत कधीच पराभव झालेला नाही.गावातील लोकांच्या गरजा भागवण्याला नेहमीच प्राधान्य दिल्यामुळे, गावातील सर्व जाती धर्माचे लोक तसेच गोरगरीब जनता सगळे अडचण आली कि केव्हाही हक्काने फोन करतात आणि रंगाआण्णा त्यांच्या मदतीला धावतात...धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून देखील एकप्रकारे जनतेची ते सेवाच करतात.धनश्री पतसंस्थेला उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रात गौरविलेले आहे.रंगनाथ धोंडे यांचे सामाजिक,राजकीय, धार्मिक,व्यापार,बँकींग क्षेत्रात असामान्य काम आहे.'वृक्षमित्र' रंगनाथ धोंडे यांचे झाडांवर नितांत प्रेम आहे.१५ वर्षापूर्वी वृक्षारोपण हे सुरू केलेलं
काम आज यशस्वीरित्या पार पडलं आहे.पोटच्या मुलांपेक्षा झाडांवर प्रेम करणारे हे वृक्षमित्र आहेत.झाडाची फांदी तोडली हळहळ करणारे ते एकमेव सामाजिक कार्यकर्ते आहेत.राजकीय प्रवासात सरपंच,उपसरपंच, उपसभापती आणि नगराध्यक्ष या सगळ्या यशस्वी कारकिर्दीतील यशामध्ये किंवा ज्यांच्यामुळे हे अलौकिक सामाजिक,राजकीय कार्य करता आले ते म्हणजे रंगनाथ धोंडे यांचे गाॕडफादर
आ.सुरेश धस यांच्या मदतीने हे शक्य झाले.अशी भावना रंगनाथ धोंडे यांची आहे.आ.सुरेश धस यांनी नेहमी रंगनाथ धोंडे यांच्या कार्य कर्तृत्वाला न्याय दिला आहे.योग्य मार्गदर्शन केले. विकास कामांना नेहमी प्राधान्य दिले. पाठीवर कौतुकाची थाप दिली.आ. सुरेश धस यांच्या सहकार्याशिवाय,मार्गदर्शना शिवाय रंगनाथ धोंडे यांचा राजकिय प्रवास यशस्वी होणे शक्य नव्हते.यात रंगाण्णाचा निस्वार्थ,साधासरळ स्वभाव साधी राहणी विकासाला प्राधान्य देणारे कार्यकर्ते आहेत.आष्टी शहरातील सर्व समाजाच्या हिताचे कामे, मुलभुत आणि नागरी सुविधा देण्याचे अखंड कार्य माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे हे करीत आहेत.गेली ४० वर्षापासुन शहर व परिसरात वृक्षलागवड आणि त्याचे स्वतःचे मुलाबाळांसारखे संगोपन करण्याचं त्यांचं विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कार्य आहे.वृक्षमित्र रंगनाथ धोंडे हे आ.धस यांचे कट्टर समर्थक आहेत. रंगनाथ धोंडे यांना आ.सुरेश धस यांच्या राजकीय गटातील " सरसेनापती " म्हटले तरी वावगे ठरणार नाही.माजी नगराध्यक्ष,वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांचा आज ६२ वर्षाचा प्रवास यशदायी, तरुणांना प्रेरणादायी आणि तितकाच थक्क करणारा आहे.आ.सुरेश धस यांच्या सर्व राजकीय,आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाची निष्ठेने भूमिका बजावणारे रंगनाथ धोंडे यांच्या सुनबाईंच्या माध्यमातून धोंडे परिवाराला पुनश्च नगराध्यक्ष हा बहुमान मिळाल्याने त्यांच्या प्रखर निष्ठेला,सचोटीला,
कष्टाला 'न्याय' मिळाला हेच खरे...आपल्या वाढदिवसानिमित्त कोणी काय,कोणी काय,उपक्रम साजरे करतात कोणी हजारो रुपये खर्च करुन पार्ट्या करतात मात्र आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी गेल्या १५ वर्षापासून आष्टी शहरात शेकडो झाडे लावले. उन्हाळ्यात त्या झाडांना टॕकरने पाणी घातले.ती झाडे जगवली, आता त्या झाडांसोबतच आपला वाढदिवस साजरा करतात.स्वताःच्या वाढदिवसापेक्षा झाडांचा वाढदिवस साजरा करणारा हा वृक्षमित्र आहे.धनश्री पतसंस्थेने आष्टी पाठोपाठ कडा व परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला.वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.आष्टी शहरातील धनश्री पतसंस्थेने
गेल्या १५ वर्षापासून १ जुलै रोजी वृक्षलागवड केली जाते.आतापर्यंत जवळपास १ हजार झाडे आष्टी शहरात लावून त्यांचे संगोपणही ही पतसंस्था करीत आहे.यावर्षीही कृषीदिन १ जूलै रोजी आष्टी येथील धनश्री पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी आपल्या ६२व्या.वाढदिवसा निमित्ताने १०० झाडे लावत आहेत. वृक्षारोपणासाठी धनश्री पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन एल.जी.सुरतवाले, पतसंस्थेचे कार्यकारी संचालक जितेंद्र शिंदे,रमेश बोराडे, शांतीलाल धोंडे परिश्रम घेत आहेत.आष्टी शहरात धनश्रीने मोठ्या प्रमाणावर झाडे लावली आहेत.आज ही झाडे २० ते ३० फुट उंचीची झाली आहेत.या झांडामुळे आष्टी शहराच्या वैभवात भर पडली आहे.१५ वर्षापासून धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून वृक्षलावगड आणि संगोपण करत आहोत. वृक्षलागवड यशस्वी करण्यासाठी रमेश बोराडे, बाळासाहेब धोंडे,सय्यद ताहेर, राम धोंडे,शांतीनाथ धोंडे,कैलाश धोंडे, दिपक कुलकर्णी, सुनिल पालखे, इनायत बेग,अशिष बोंदार्डे हे परिश्रम घेतात.आज आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ...
-- उत्तम बोडखे
(उपसंपादक)
-------------------------
0 टिप्पण्या