


आष्टी (प्रतिनिधी)
पंढरपूरचे विठ्ठल हे सर्वांचे दैवत आहे.आपल्या सुख दुःखाच्या
प्रसंगी विनम्र भाव ठेवून नतमस्तक होण्यात माणूस धन्यता मानतो.सद्यस्थितीत विविध
भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीकडे प्रस्थान करीत आहेत.दरम्यान भीमसेन धोंडे
यांचे जन्मगाव असलेल्या रुईनालकोल येथील देवस्थान व पायी दिंडीसाठी पांढरा शुभ्र
"गणेश " नावाचा अश्व अर्पण केला.रुईनालकोल गावात सोमवारी वाजत गाजत मिरवणूक करुन
एका कार्यक्रमात हा अश्व अर्पण केला. आठवड्यापुर्वीच श्री क्षेत्र गहिनीनाथगडासाठी
माजी आ.भीमसेन धोंडे यांनी दोन अश्व अर्पण केले होते.भीमसेन धोंडे यांना त्यांच्या
जन्मगावचे वारकरी व ग्रामस्थ काल रविवारी भेटले व त्यांनी गावातील दोन्ही
देवस्थानासाठी एका अश्वची मागणी केली.भीमसेन धोंडे यांनी तात्काळ ती मागणी मान्य
करीत तुम्ही गावकरी मंडळीने हा अश्व सांभाळवा अशी सुचना दिली. आज सोमवारी कराड
येथुन आतापर्यंत ज्या अश्वावर सवारी न झालेला गणेश नावाचा अश्व आणला.माजी आमदार
भीमसेन धोंडे यांनी अत्यंत पवित्र मनाने हा अश्व अर्पण केला.या अश्वाच्या स्वागत
मिरवणूकीत धोंडे सहभागी झाले.दि.२७ जुन रोजी रुईनालकोल ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा
पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.अत्यंत पवित्र पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक
होण्यासाठी जाणाऱ्या वारकरी, भाविक भक्तांत हा अश्व दिल्याने चैतन्य आले व उत्साह
वाढला. यावेळी बोलताना माजी आ.भीमसेन धोंडे म्हणाले की, घोड्याची सेवा श्रीकृष्ण
देवाने केलेली आहे. अर्जुनाचे घोडे देवाने धुतले आहेत.हे विसरु नका.हा गावाचा घोडा
आहे. सर्वानी या घोड्याची सेवा व पुजा करावी. रुईनालकोल येथुन २७ जुन रोजी पंढरपूर
पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे.त्यात हा गणेश घोडा जाणार आहे.पांडुरंगाच्या
कृपेने सर्वसामान्यांची मनोभावे सेवा करण्याची शक्ती,बळ आणि ऊर्जा येऊ दे अशी
प्रार्थना यावेळी केली.यावेळी माजी सरपंच संजय नालकोल यांनी प्रस्ताविक केले.यावेळी
जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, बबनराव औटे,पाटोदाचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,ह.भ.प.
दिनकरराव तांदळे यांचे भाषणे झाले.यावेळी सरपंच तात्यासाहेब नालकोल, उपसरपंच विष्णू
मांढरे,उपसभापती नामदेव धोंडे,माजी सरपंच संजय नालकोल, प्रा. संजय धोंडे,प्रा.
श्रीकांत धोंडे,राजेंद्र धोंडे,माजी प्राचार्य आजिनाथ बोडखे, प्राचार्य उत्तम
भुकन,प्राचार्य दादासाहेब काळे, सागर फरांडे, ज्ञानेश्वर पुंड,ह.भ. प.सुरेश महाराज
नालकोल,बबन ढवळे,हरिभाऊ खोडके,हनुमंत सासोडे,अनिल गजघाट,शांतीलाल खिलारे, आजिनाथ
कन्हेरकर,आजिनाथ हिंगणे,योगेश फरांडे, नानाभाऊ आडकर, सर्जेराव नालकोल, रंगनाथ
बनसोडे, आनंदराव बनसोडे, परमेश्वर गांजुरे, सुरेश आडकर, हरिभाऊ दळवी गावातील सर्व
ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. चौकट -------- भीमसेन धोंडेंचा साधेपणा आणि
अध्यात्म दृष्टीने वारकरी आनंदी! ---------------- माजी आमदार भीमसेन धोंडे हे
बलाढ्य व्यक्तिमत्व आहे.चार वेळा आमदार राहिलेले आणि विविध शैक्षणिक संस्था,बँका
अशा मोठ्या साधन संपत्तीचे मालक आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी
स्वावलंबी जीवनाचा ध्येय मार्ग आहे.धोंडे यांनी आज सामान्य वारकऱ्यांच्या सोबत
मिसळून आनंद घेतला. ----------------
0 टिप्पण्या