Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी अमिया येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे लोकमता,राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी (३००) वी.जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.माजी आ.साहेबराव दरेकर,राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब चौधरी, युवानेते अभिजीत शेंडगे, सिद्धेश्वर शेंडगे सर,सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,टाकळीचे सरपंच सावता ससाणे,ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,सचिन चौधरी,माजी सरपंच संदीप चौधरी,रविंद्र भुकन,आदिनाथ पडोळे,विष्णु निंबाळकर,दिगांबर बोडखे, राजेंद्र तांगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील सर्व महिलांनी घेतला पाहिजे. शूरवीर असणाऱ्या व दूरदृष्टी असणाऱ्या अहिल्यादेवींचे विचार आत्मसात करण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ.साहेबराव दरेकर यांनी केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे म्हणाले की,अहिल्यादेवी होळकर या दूरदृष्टी असलेल्या कर्तबगार महिला होत्या.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ,गंगाघाट, रामेश्वरम,सोमनाथ,द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्रस्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले.याशिवाय देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा,घाट,कुंड, विहिरी,अन्नछत्रे आणि विश्रामगृहे उभारली.हे कार्यकोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी केले गेले.त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा,अन्न आणि आधार मिळाला.त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात लोक कल्याणकारी राज्यशासनाचा आदर्श नमुना मानले जाते.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या