Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाच्या शुभेच्छा जगण्याची उमेद वाढवतात ........... जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे

आष्टी (प्रतिनिधी) दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्या प्रश्न सर्वांच्या सोबत असतात.या समस्यांमधून वाढदिवसा सारख्या उत्सवातून अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा,आशीर्वाद या माध्यमातून मनुष्याला जगण्याची ऊर्जा,शक्ती आणि बळ मिळते असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी व्यक्त केले. आष्टी येथील पत्रकार प्रा.निसार शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांच्यावतीने त्यांना केक खाऊ घालत पेढा भरवून आणि बुके देत फेटा बांधून त्यांचे शुभेच्छा दिल्या.त्यांना दीर्घायुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे बोलत होते.यावेळी पत्रकार आण्णासाहेब साबळे,समीर शेख, संतोष नागरगोजे यांनी प्रा.निसार शेख यांना पुष्पगुच्छ आणि फेटा बांधून शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे पुढे म्हणाले की,वाढदिवसाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याला एक नवी ऊर्जा शक्ती आणि बळ मिळते.मनुष्य हा उत्सवप्रिय असतो.ही भावना लक्षात घेता दैनंदिन प्रश्न समस्या यातून विरंगुळा आणि नवचैतन्य येण्यासाठी वाढदिवस हा एक महत्त्वपूर्ण क्षण असतो.यातून जगण्यासाठी तेजस्वी दिशा मिळते असे सांगत ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी प्रा. निसार शेख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या