Ticker

6/recent/ticker-posts

पांढरी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पांढरी येथील हनुमान मंदीर देवस्थान येथुन पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळा आषाढीनिमित्त प्रतिवर्षी जात आहे.यंदाचे २० वे. वर्षे आहे.दिंडी चालक ह.भ.प.धोंडीबापु वांढरे महाराज आणि ह.भ.प.प्रशांत महाराज भोगाडे यांंच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दि.२७ जुन २०२५ रोजी दिंडी प्रस्थान होणार आहे. पांढरी, आळजापूर,करमाळा,खडकी, शेलगाव,कंदर,परिते,करकंब,दिवाणमळा ते पंढरपूर असा दिंडी मार्ग आहे.पायी दिंडी सोहळ्यात ह.भ.प.प्रशांत महाराज भोगाडे,ह.भ.प. काशीनाथ महाराज शेंबडे, ह.भ.प.गोविंद महाराज पवार, ह.भ.प.धोंडीबापु महाराज वांढरे, ह.भ.प.बिभिषन महाराज शिंदे, ह.भ.प. काकासाहेब महाराज निगुडे, ह.भ.प.भांडवलकर ताई महाराज यांचे कीर्तन होणार आहेत.सोमवर दि.७ जुलै रोजी सकाळी पंढरपूर येथे ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे.त्यानंतर दिलीपदादा हंबर्डे यांची व्दादशीनामित्त पंगत होणार आहे. दि.३ जुलै रोजी सायंकाळी ह.भ.प.बिभीषण शिंदे,दि.४ जुलै ह.भ.प. नानासाहेब भोगाडे महाराज, दि.५ जुलै रोजी ह.भ.प. शिवानंद महाराज पाटील (नाशीक),दि.६ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळात ह.भ.प.कैलाश महाराज भोरे तर सायंकाळी ६ ते ८ यावेळेत गोसेवक ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे हरिकीर्तन पंढरपूरच्या मठात होणार असल्याची माहिती ह.भ.प. धोंडीबापु वांढरे महाराज यांनी दिली. हा पायी दिंडी सोहळा दि.३ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.दिंडी सोहळ्यात काकडा भजन काशीनाथ शेंबडे, बापूराव रखमजी वांढरे,बापू शिंदे समस्त ग्रामस्थ पांढरी व भजनी मंडळी करणार आहेत.दिंडीत मोफत आरोग्य सेवा डॉ.गणेश पिसाळ, डॉ.सुरेश हंबर्डे (आष्टी) हे करणार आहेत. या दिंडीतील सर्व वारक-यांना मोफत गोळ्या औषधे शरद वांढरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, पांढरी (ट्रस्ट नोंदणी क्र. २१४४) भगवाननगर सांगोला रोड (पंढरपुर) बाळुमामाच्या मठाशेजारी दिंडीचा दि.७ जुलैपर्यत मुक्काम राहणार आहे. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या