Ticker

6/recent/ticker-posts

आईचे दर्शन घेऊन शाळेत जा. लाख मोलाचा आशीर्वाद मिळेल! .............. दलितमित्र कॉ.इकबाल पेंटर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

आष्टी (प्रतिनिधी) आजची मुले ही उद्याची राष्ट्राची बलशाली पिढी आहे.किंबहुना चिमुकल्यांच्या संस्कारातून देशाचे बलस्थान ठरणार आहे. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना आपल्या आईचे दर्शन घेऊनच बाहेर पडावे आणि विद्या मंदिरात ज्ञानार्जन करावे, तुम्हाला खूप आशीर्वादाची प्राप्ती होईल..!" असा मौलिक संदेश ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि दलित मित्र कॉ.इकबाल पेंटर यांनी दिला! ९५ वर्षे पूर्ण करून ९३ वर्षात पदार्पण करणारे.. गेल्या ७० वर्षाहून अधिक काळ सातत्याने रस्त्यावर राहून गोरगरीब दिंनदलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर वंचित घटकांसह झोपडीतल्या माणसांची मनोभावे सेवा करणारे काँ. दलित मित्र एकबाल पेंटर यांनी आज बुधवारी घाटशिळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयास सदिच्छा भेट देऊन चिमुकल्यांशी अत्यंत सर्हदय अंत:करणातून आणि विनम्र भावनेने थेट संवाद साधला. पेंटर पुढे म्हणाले, "ज्ञानमंदिरातील ही चिमुकले मुले भविष्यातील राष्ट्राची पाया आहेत. जगाच्या इतिहासात हिंदुस्तान चा एक वेगळा संस्कारमय इतिहास निर्माण करण्यासाठी या ज्ञानमंदिरातून एक एक पनती तेजस्वी रूपाने पुढे येणार आहेत. गुरुजनांचे संस्कार आणि शिक्षणातून राष्ट्रीय प्रेमाची जाज्वल्य भावना, समता बंधुत्व ऐक्य सर्वधर्मसमभावाची मुल्ये ही याच मातीत रुजत असतात. या अनुषंगाने एकबाल पेंटर यांनी थेट आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांशी विविध बाबींवर संवाद साधून चांगुलपणाचे मौलिक धडे दिले. विद्यार्थी ही अक्षरशः अंतर्मुख होत भारावून गेले.यावेळी घाटशिळा महाविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस.सी. वारभुवन,प्रा.बी‌.के.मुंडे प्रा.के.एच.सय्यद,आर.के. खेडकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बिभिषण चाटे, प्रा.एस.ए.बटुळे यांनी इकबाल पेंटर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सज्जाद सर यांनी आभार मानले. चौकट ------------ ९२ वर्षाचा शिक्षण प्रेमी काँ. अन् संस्काराची तळमळ -------------------------------- पाटोदा येथील क्रांतिकारी भूमीमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षापासून समता बंधुत्व आणि ऐक्यासाठी रस्त्यावर उतरून चळवळीत काम करणारे एकबाल पेंटर यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आलेला आहे. झोपडीतल्या माणसाचा आवाज बनण्याचे त्यांनी पुण्य मिळवले.९२ वर्षानंतरही ते सायकलवर शहरात प्रवास करून वेगळा आदर्श निर्माण करतात.आज घाटशिळा ज्ञान मंदिराच्या चिमुकल्यांची थेट संवाद करून त्यांनी दिलेली मूल्य विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरतील! असा विश्वास ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या