

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात अवैध सावकारीमुळे अनेक कुटुंबे
उध्वस्त झाली आहेत. अनेकांना घरदार,गाव सोडुन पळुन जावे लागले आहे.अनेक कुटुंब
उघड्यावर आली आहेत. अनेकांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले आहे.या अवैध
सावकारांना कोणाची भीती राहिलेली नाही.त्यामुळे अवैध सावकारी बंद करण्यासाठी आपण
आवाज उठवणार आहोत.जे लोक खासगी सावकारीला व पाचपट व्याजाला त्रासलेले आहेत त्यांनी
आपल्याकडे नावे व पुरावे द्यावेत आपण या प्रकरणी बीड जिल्हा पोलीस प्रमुखांकडे
तक्रार करणार आहोत वेळपडल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट
घेणार आहोत. खासगी सावकार पाचपट रक्कम वसुल करुन अभद्र बोलुन अपमानास्पद वागणुक
देतात.त्याचाच पाटोदा येथीला आमचे ३० वर्षापासुन कट्टर कार्यकर्ते असलेले संजय
कांकारिया हे बळी ठरले म्हणून अवैध सावकारी बंद करण्यासाठी आपण आवाज उठवणार
आहोत.कांकारिया आत्महत्या प्रकरणातील सुसाईट नोटमधील दोन आरोपी फरार आहेत त्यांना
तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे. आष्टी
येथील भगवान महाविद्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी आ.
धोंडे पुढे म्हणाले की,आष्टी शहरामध्ये तरुण युवकांची पिढी या धंद्याकडे वळली आहे
ते गरजू व्यक्तींना पैसे देतात आणि कित्येक पटीने वसुली करतात.व्याजावर व्याज
आकारून कर्जदाराला प्रचंड अडचणीत आणतात त्याच्या या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा
घेऊन आष्टीतले खाजगी सावकार गब्बर झाले आहेत.पाटोदा येथील संजय कांकरिया हा तरूण
व्यापारी अवैध सावकारकीचा बळी ठरले आहेत.अवैध सावकार पाचपटीने पैसे घेऊनही त्यांचे
समाधान होत नाही अवैध आणि बेकायदेशीर पद्धतीने चाललेल्या सावकारी विरुद्ध
कर्जदारांनी न्याय मागावा पोलिसांकडे तक्रार करावी, सहाय्यक निबंध सहकारी संस्था
यांच्याकडे तक्रार करावी.याकामी त्यांना सहकार्य मिळाले नाही तर त्यांनी आपणाकडे
यावे असे जाहीर आवाहन माजी आ.धोंडे यांनी यावेळी केले.आपण जिल्हा पोलीस अधीक्षक बीड
आणि वेळप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन
या अवैध सावकारी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करणार आहोत असे माजी
आ.भीमराव धोंडे सांगितले.
-------------------
0 टिप्पण्या