Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे भानुदास धोंडे यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील भोन्याई देवी येथील जेष्ठ नागरिक भानुदास येदु धोंडे (वय ९७) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी सायंकाळी ५ वा. निधन झाले. त्यांच्यापाठीमागे विश्वनाथ धोंडे,बबन धोंडे आणि पोपट धोंडे हे तीन मुले कुसुम व मालन या दोन मुली, सुना नातवंडे,सीताराम टेलर,गंगाराम व बाळासाहेब धोंडे हे तीन भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे. अंत्यविधी भोन्याई मंदिराजवळ मुर्शदपूर येथे झाला. यावेळी विठ्ठलराव बन्सोडे,राजेंद्र धोंडे, सरपंच अशोक मुळे, नामदेव राऊत, शेंडगेनाना, संपतराव धोंडे, पोपट घुले,प्रा.डी. बी.राऊत,अंकुश निमोणकर, त्रकार उत्तम बोडखे, अशोक टेकाडे, प्राचार्य संजय बोडखे,आदेश निमोणकर,चंद्रकांत तुपे,संतोष शिंदे फिटर,जमदाडे फिटर,प्रा.संजय राऊत,प्रा.राम बन्सोडे,इंजि.पी.बी.बोडखे,सुनिल बोडखे,भगवान विधाते,राजेंद्र लाड, दत्ता रणसिंग आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चौकट -------- कष्टाळू शांत धार्मिक वृत्ती ------------- भानुदास धोंडे हे अत्यंत कष्टप्रद जीवन जगले.सरळ साधा स्वभाव आणि कष्टाळू पद्धतीने आयुष्यभर शेतीमध्ये कष्ट आणि राबत त्यांनी जीवन काढले ईश्वरावर श्रद्धा असल्याने किर्तन भजन प्रवचनाची ही त्यांना आवड होती.ते वारकरी माळकरी होते. त्यांच्या जाण्याने आप्त स्वकीयात हळूहळू व्यक्त केली जात आहे. --------------- उपसंपादक उत्तम बोडखे यांचे मामा ------------------ भानुदास येदु धोंडे हे ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांचे मामा होते.भाचा म्हणून भानुदास धोंडे यांनी उत्तमरावांना बालपणामध्ये अनेक लाड पुरवण्यापासून सातत्याने मदतीची भावना ठेवून पुढाकार घेतला. शेतकरी कुटुंबातील असल्याने परिसरामध्ये त्यांचे आयुष्य गेले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या