Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे ओंकार सुभाष रासकर एलएलबी परीक्षा उत्तीर्ण

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक सुभाष विश्वनाथ रासकर व सौ. शशिकला सुभाष रासकर यांचे चिरंजीव ओंकार रासकर यांनी एलएलबीची पदवी संपादन केली आहे.ओंकार रासकर यांचे विधीचे शिक्षण भारतातील सर्वश्रेष्ठ असलेल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,बँगलोर येथून पूर्ण झाले आहे. त्याने " अ " श्रेणी म्हणजे प्रथम वर्गात येऊन पदवी संपादन केली आहे. विशेष बाब म्हणजे ओंकार रासकर यांना पदवी पूर्ण होण्यापुर्वीच केंद्रशासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयातील GAIL India Ltd. कंपनीत कायदेशीर सल्लागार पदावर नोकरी प्राप्त झाली आहे. पदवीदान समारंभ हा लवकरच बँगलोर येथे होणार आहे. ओंकार रासकर यांना भारताचे सरन्यायाधीश व महाराष्ट्राचे सुपुत्र मा.चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री भूषण गवईसाहेब यांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे.ओंकर रासकर यांच्या या यशाबद्दल माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर,विठ्ठलराव बन्सोडे,विजय गोल्हार,नामदेव राऊत,दत्ताभाऊ सायकड,डाॕ. स्वप्निल शिंदे,बाळासाहेब शिंदे, पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.डाॕ. नवनाथ विधाते,बाळासाहेब रासकर,किसन रासकर,डाॕ. संदीप सायकड,संतोष सायकड, बाळासाहेब सायकड,ॲड. नवनाथ विधाते आदि नातेवाईक,मित्र परिवाराने अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या