Ticker

6/recent/ticker-posts

नैसर्गिक शेतीचा लाखेफळात यशस्वी प्रयोग ............. ह.भ.प.सोमनाथ ढाकणे महाराजांची 'अन्नपूर्णा रोपवाटिका' शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान!

आष्टी (प्रतिनिधी) अत्यंत अल्प खर्चामध्ये योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करून शेतीमध्ये केवळ नैसर्गिक बियाणे खते आणि रोपे तयार करून नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न करत राहणारे कष्टाळू शेतकरी ह.भ.प.सोमनाथ ढाकणे महाराजांचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.ह.भ.प. सोमनाथ ढाकणे महाराज यांनी तरुण वयात तीर्थक्षेत्र आळंदी येथे अध्यात्माचे शिक्षण घेतले. मूळचे लाखेफळ येथील असल्याने त्यांनी या भागामध्ये कीर्तन प्रवचन भजन तसेच पखवाज वादनातून एक आध्यात्मिक ओळख निर्माण केली.यावेळी त्यांना वारकरी शिक्षण संस्थेचे हभप रखमाजी महाराज नवले पाटील पैठणकर यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान, त्यांच्या मूळ गावी लाखेफळ ( ता.शेवगाव ) येथे त्यांनी आपल्या दीड एकर जमिनीमध्ये निरोगी पिढी निर्माण व्हावी म्हणून नैसर्गिक शेतीचा प्रयोग सुरू केला.यामध्ये कांदा ऊस, आंबा,नारळ,लिंबूनि,चिक्कू, आवळा,सिताफळ,जांभूळ आदी सह विविध भाजीपाला आणि रोपवाटिका तयार केल्या आहेत.यासाठी त्यांनी सुनियोजित शेडची उभारणी केली आहे.या अत्यंत कष्टप्रद व्यवसायामध्ये ह भ प सोमनाथ महाराज ढाकणे यांच्या समवेत त्यांचे वडील दत्तात्रय नाना ढाकणे,आई इंदुबाई दत्तात्रय ढाकणे,पत्नी तसेच मुलगी ज्ञानेश्वरी, गौरी आणि मुलगा अच्युत हे आपल्या शालेय वेळे व्यतिरिक्त शेतीत परिश्रम करतात.ह.भ.प.सोमनाथ महाराजांनी ही तयार आणि उपलब्ध केलेली रोपे यांना पाथर्डी शेवगाव पैठण गेवराई आदींसह इतर तालुक्यातीलही शेतकऱ्यांची पसंती आहे. आणि त्यानुसार शेतकरी ग्राहक आहेत.एकूणच, माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी अध्यात्मा बरोबरच कृषी जीवनाशी सुसंगत नाते जपून ह.भ.प. सोमनाथ महाराज ढाकणे यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. रोपवाटिकेचे अत्यंत अल्प खर्चामध्ये योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करून विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचे लाखेफळ,दहिफळ,घोटण सह एरंडगाव आणि विविध वाड्या वस्त्या आणि तालुक्यामधील कृषीप्रेमी जणांकडून कौतुक होत आहे. चौकट -------- शेतकऱ्यांसाठी 'अन्नपूर्णा रोपवाटिका' ठरतेय वरदान! ----------------------------- ह.भ.प.सोमनाथ ढाकणे महाराजांनी अध्यात्म सेवे समवेतच नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे. आंबा नारळ लिंबूनी चिकू आवळा सिताफळ जांभूळ आदी फळांची रोपे त्यांनी तयार करून शेतकऱ्यांसाठी एक नवा जगण्याचा ऊर्जा स्त्रोत निर्माण केला आहे. कमी खर्चात योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल, असा विश्वास यावेळी अन्नपूर्णा रोपवाटिकेचे प्रमुख ह भ प सोमनाथ महाराज डाकेफळकर यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या