
माऊलीनगर,आष्टी (प्रतिनिधी )
२० व्या.शतकातील महान सद्गुरू संत ज्ञानेश्वर
माऊलीदादा महाराज यांच्या २५ व्या.पुण्यस्मरणार्थ रौप्यमहोत्सवी सप्ताह सोहळ्यात
शिव कथाकार ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांच्या शिव महापुराण कथेस प्रचंड
जनसमुदायांच्या उपस्थित सुरुवात झाली.माऊली दादाच्या रौप्यमहोत्सवी सप्ताह सोहळ्यात
महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे.सप्ताहात संत महंत,महाराज यांच्या हस्ते शिव
महापुराण ग्रंथ पूजन करण्यात आले.महाराष्ट्रातील भक्तीच माहेरघर श्री क्षेत्र
चाकरवाडी आहे. चाकरवाडी नंतर माऊली चाकरवाडीकर यांचा भव्य दिव्य सप्ताह आष्टी शहरात
माऊली नगरात शिव महापुराण कथा झाली.सात दिवस भाविक भक्तांचा महापूर माऊलीनगरात
आला.यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर,राजेंद्र धोंडे, डाॕ.मधुकर हंबर्डे,विठ्ठलराव
बन्सोडे,भालेकर माहाराज, ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे महाराज,आजबे महाराज, संतोष
महाराज मोरे,ह.भ.प. श्रीहरि पुरी महाराज,ह.भ.प. दिनकरराव तांदळे,गोविंद पवार
सर,सोनाजी बनकर,अनिल महाराज गरुड,रविंद्र तवले, तुळशीराम आडसरे,अशोक काकडे
महाराज,इंजि.पी.बी. बोडखे,तुकाराम महाराज भोसले,विष्णु नन्नवरे सर,जेष्ठ पत्रकार
उत्तम बोडखे,नामदेव तावरे,कपील अग्रवाल,हौसराव आजबे,सुनिल तोडकर,डी.ए. निंबाळकर,आबा
गांगर्डे, बलभीम धोंडे,शिवाजी बिडवे, अशोक डोके,तरटे महाराज, भाऊसाहेब
कोकणे,आश्रुबा मुटकुळे,सरपंच सौ.शालन मुळे,भागवत शेकडे, माजी सरपंच आदिकाताई लोखंडे
आदि मान्यवर उपस्थित होते. शिव कथाकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांना रघुनंदन
थोरात,विशाल इंगळे, नरसिंग मरकळे,अक्षय पांचाळ, रविंद्र पवार,मनोहर पाटील, गंगेश्वर
पालीमकर यांची साथ संगत लाभली. चौकट -------- शिवमहापुराण कथेला माजी आ.भीमराव
धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर यांची भेट ------------ विसाव्या शतकातील महान
संत,ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त
आष्टीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा सोहळ्याला हजारो
महिला,पुरुषांची गर्दी होती. या सोहळ्यात माजी आ.भीमराव धोंडे, सौ. दमयंतीताई धोंडे
यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिव महापुराण कथेच्या आरतीत सहभाग घेतला.
शिव महापुराण कथेतील आरतीत सहभागी होत हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात
रममाण झाले. यावेळी अ.भा. वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव तांदळे महाराज
यांनी माजी आ.भीमराव धोंडे व माजी आ.साहेबराव दरेकर यांचे सोहळ्यात औपचारिक स्वागत
केले. -----------------
0 टिप्पण्या