
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक
करण्यासाठी व जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा
तहसील कार्यालयात जनतदा दरबार भरवण्यात येणार आहे अशी माहित आष्टीच्या तहसीलदार
वैशाली पाटील यांनी दिली. आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांनी शुक्रवार दि.३० मे
रोजी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की,जनता दरबार कार्यक्रमा अंतर्गत
प्रामुख्याने शेतरस्ते,पाणंद रस्ते,अकृषीक परवाने देणे,वीटभट्टी परवाना,गौणखनिज
उत्खनन परवाना, मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे, नैसर्गिक आपत्ती
अंतर्गत नुकसानीबाबत, सातबारामधील दुरुस्ती,अन्नधान्य पुरवठा विषयक समस्या, संगायो
इंगायो योजने अंतर्गत लाभार्थी यांच्या समस्या, जन्म,मृत्यू नोंदीबाबत व इतर
जनतेच्या महत्वाच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जनता
दरबारामध्ये अर्जदार यांनी येताना त्यांची तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे
व अर्जासोबत प्रबळ पुरावे सादर करावेत.जनता दरबार दिनासाठी नागरीकांकडून प्राप्त
झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार असून प्रत्येक अर्जावर निवेदनावर तहसिल
प्रशासनाच्यावतीने परिणामकारक कार्यवाही करण्यात येणार आहे.तक्रार, निवेदन वैयक्तिक
स्वरुपाचे नसेल असे अर्ज जनता दरबारात स्विकारले जाणार नाहीत.जे अर्ज जनता दरबार
दिना करिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक
कारवाईसाठी आठ दिवसात पाठविण्यात यावेत व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल.आष्टी
तालुक्यातील नागरीकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी, बीड यांनी
दि.२७ मे रोजी महसूल आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनानुसार यापुढे तहसिल कार्यालय
आष्टी मुख्यालयामध्ये आठवड्यातील प्रत्येक सोमवार व गुरुवार या दोन दिवशी दुपारी १२
ते २ वाजेपर्यंत जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून ज्या नागरीकांना त्यांचे
कामामध्ये अडचणी/समस्या येत असतील त्यांनी त्यांचे वैयक्तिक अर्ज, निवेदनासह सबळ
पुराव्यासह जनता दरबारात सहभागी होण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने सर्व जनतेस
आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या