
आष्टी (प्रतिनिधी)
सध्या मानवतेचा होत असलेला ऱ्हास पाहायला मिळत आहे.देवपूजेचे
अवडंबर करण्यापेक्षा मानवपूजा केल्याने मोठे पुण्य लाभते,'जे का रंजले
गांजले,त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा,देव तेथेचि जाणावा' हे आचरण
ज्याच्या जवळ असेल तोच खरा भाग्यवंत होय.जन्म मृत्यू वा कुठलीही भौगोलिक गोष्ट ही
भगवंतांचीच देणं असते असे प्रतिपादन ह.भ.प.अदिनाथ महाराज दानवे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
आष्टी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आयोजित केलेल्या
पंचदिनी किर्तन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवार दि.१२ मे रोजी किर्तन सेवेत
ह.भ.प.अदिनाथ महाराज दानवे बोलत होते. ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे म्हणाले की, जीवन
जसे वाट्याला येईल तसे जगावे.जे उपलब्छ होईल ते अंगीकारावे आनंदी जीवन जगा.तुमच्या
वाट्याला सुख दुःख,वेदना आल्या तर त्या हसत मुखाने सहन करा,प्रेम आले तर प्रेम
वाटा,वाट्याला आलेले मनापासून स्वीकारा. द्विधा मन:स्थितीत,रडतपडत, कण्हत जगू
नका.आपल्या मनस्थितीवर आपले जीवन अवलंबुन असते. सुख आपण आनंदाने स्वीकारतो पण दु:खं
स्वीकारत नाही.दुःख ज्या दिवशी खुल्या मनाने स्वीकाराल त्या दिवसापासून जन्म मृत्यू
या दोन्ही घटनांकडे समान नजरेने बघायला शिकाल.इतके वय झाले तरी मनाची पाटी कोरी
आहे.त्याने जीवन जाणले आणि तो मृत्यूही जाणून घेईल.ज्याला जीवन आणि मृत्यू दोन्ही
कळाले.त्याला परमत्म्या ओळखला आहे असे समजा. परमात्मा जीवनात आहे तसा मृत्यूमध्येही
आहे.जीवन म्हणजे परमात्म्याचा दिवस तर मृत्यू म्हणजे त्याची रात्र.ज्याने केवळ
दिवसच जाणला पण रात्रीबद्दल काहीच जाणू शकला नाही, त्याचे ज्ञान अपूर्णच म्हणायला
हवे. असच जीवनभराच्या कष्टाने थकला भागलेला माणूस मृत्यूच्या शांत झोपेची इच्छा
धरतो.जो नीटपणे जगला,तोच नीटपणे मृत्यूचा स्वीकार करू शकतो.सम्यक जीवनातून सम्यक
मृत्यूची प्राप्ती होते. मृत्यूचे अजिबात भय बाळगू नका.घाबराल तर जीवन हातून निसटून
जाईल आणि मृत्यूही निसटेल.त्या अवस्थेत तुमचे जगणे न जगण्यासारखे असेल आणि मरणही
तसेच असेल. सगळीकडून रिकामेच राहाल. दु:खही सहन होत नाही आणि सुखही सहन होत नाही
अशी तुमची अवस्था असेल तर तुमच्या डोळ्यावरची झापडं दूर होऊन तुम्हाला तुमच्या
अंतरंगात दिसायला लागेल.या अवस्थेचा उपयोग करा.प्रेम आणि पीडा दोन्हीपासून मुक्त
होण्यासाठी नामचिंतन आवश्यक असल्याचे ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे यांनी सांगितले.
-------------------
0 टिप्पण्या