Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या वाढदिवसानिमित्त 'लेकीची' अनोखी 'गिफ्ट'... .................. दहावी बोर्ड परीक्षेत कु.सिध्दी‌ चाटे रेसिडेन्शिअल विद्यालयातून अव्वल!

आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर झाला.यात शेवगाव येथील रेसिडेन्सीयल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.सिद्धी बिभिषण चाटे ही ९६.६० टक्के गुण घेत अव्वल ठरली आहे.तिने विद्यालयातून मुलींमध्ये प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. मागासवर्गीयातूनही सर्व‌द्वितीय तसेच इंग्रजी विषयात तब्बल ९७ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे आई शिक्षिका आशा बिभिषण चाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ही गिफ्ट ठरली आहे.रेसिडेन्सीअल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधून यंदा ४०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.विद्यालयाचा ९४ टक्के निकाल लागला असून कु.सिद्धी बिभिषण चाटे हिने ९६.६० टक्के गुण संपादन करून मुलींमध्ये सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कु.सिद्धी चाटे ही इंग्रजी विषयात ९७ गुण घेत विद्यालयातून सर्वप्रथम आली आहे.विद्यालयाच्या गुणाक्रमे मुलींच्या यादीतही ती विद्यालयातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.कु. सिद्धी चाटे हिची उत्कृष्ट बाल गायिका म्हणून लोकप्रियता आहे. शिस्तप्रिय विद्यार्थिनी तसेच शिक्षक दिनानिमित्त उप मुख्याध्यापक म्हणून तीने उत्कृष्ट कर्तव्य निभावले आहे. मंथन आणि शिष्यवृत्ती परीक्षेतही ती पात्र ठरलेले आहे.कु.सिद्धी चाटे हिच्या यशाबद्दल प्राचार्य बालाजी गायकवाड, प्राचार्य रायते, पर्यवेक्षक मकासरे ,वर्गशिक्षक संतोष मिसाळ आदी सह सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे. चौकट ---------- इंग्रजी विषयात ९७ गुण; सर्वप्रथम येण्याचा बहुमान! ------------------ इंग्रजी या अत्यंत अवघड समजला जाणाऱ्या विषयात कु. सिद्धी चाटे हिने ९७ गुण घेतले आहेत. एवढे गुण घेणारी रेसिडेन्सी विद्यालयातील ती पहिली विद्यार्थिनी असून प्रथम क्रमांक मिळवून पुरस्काराची मानकरी ठरली आहे.इंग्रजी विषय शिक्षक संतोष मिसाळ यांचे तिला मार्गदर्शन लाभल्याचे तिने माध्यमांना सांगितले. चौकट -------- मुलींमध्येही विद्यालयात सर्वप्रथम! ----------------- कु.सिद्धी चाटे हिने खडतर परिश्रम,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर इंग्रजीत सर्वप्रथम येण्याबरोबरच मुलींमध्येही सर्वप्रथम येण्याचा दुहेरी मान प्राप्त केला आहे.या यशाचे प्राचार्य बाबाजी गायकवाड यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सचिव यांनी कौतुक केले आहे.कु.सिद्धी चाटे हिची आई सौ.आशा बिभिषण चाटे या आदर्श शिक्षिका आहेत. हिंदी साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यांचा आज वाढदिवस. आणि याच दिवशी बोर्डाचा निकाल जाहीर झाला.अन् लेकीने चौफेर यश हासली करत अव्वल गुण प्राप्त करून इंग्रजी आणि मुलींमध्ये प्रथम येऊन आईला वाढदिवसाची अनोखी 'गिफ्ट' दिली आहे. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या