Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी शिक्षण संस्था आणि भगिनी संस्थेने १० वी. निकालात राखली उज्ज्वल परंपरा .............. ३९ शाळांपैकी १९ शाळांचा १०० टक्के निकाल

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील शेतकरी संस्था आणि भगिनी संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी दि.१३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर केला आहे.शेतकरी शिक्षण संस्था आणि भगिनी संस्थेने निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे.संस्थेच्या ३९ शाळेपैकी १९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे... ------------------ पंडित नेहरू विद्यालय आष्टी, पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा,मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव, श्रृंगेरी विद्यालय ब्रम्हगाव,श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी, जोगेश्वरी विद्यालय पारगाव (जो.), निजाम पटेल विद्यालय मेहकरी (कानडी),अश्वलिंग विद्यालय पिंपळवंडी,राजीव गांधी विद्यालय मातावळी,क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय चुंबळी, संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा,ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगांव घाट,अहिल्यादेवी विद्यालय टाकळी आमिया,महेश विद्यालय रुईनालकोल,पाटोदा उर्दू हायस्कुल पाटोदा,भैरवनाथ विद्यालय अंमळनेर, ज्योतिर्लिंग विद्यालय कानडी बु.,माऊली विद्यालय बोरोडी, आष्टी पब्लिक स्कुल आष्टी या १९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.श्रीराम विद्यालय कडा आणि जयभवानी विद्यालय जळगांव या शाळांचे ९८ टक्के,वृध्देश्वर विद्यालय गहुखेल व कानिफनाथ विद्यालय चोभनिमगांव या शाळांचे ९७ टक्के निकाल लागला. हरिनारायणस्वामी विद्यालय क-हेवाडी, संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा, पांडुरंग विद्यालय निमगाव बोडखा, हनुमान विद्यालय घाटा पिंप्री, सय्यदमीर बाबा विद्यालय लोणी, आंबिका विद्यालय बेलगाव,छत्रपती शिवाजी विद्यालय आष्टी या सात शाळांचे ९६ टक्के निकाल लागले आहेत.रोडेश्वर विद्यालय डोंगरगण, नागनाथ विद्यालय नागतळा,यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी,विट्ठल विद्यालय नांदुर या शाळांचे ९५ टक्के निकाल लागला आहे.इंदिरा कन्या विद्यालय धामणगाव, यशवंतराव होळकर विद्यालय शिरूर, प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव,सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण,भगतसिंग विद्यालय किन्ही या शाळांचे ८० ते ९५ टक्के निकाल लागला आहे. शेतकरी शिक्षण संस्था आणि भगिनी संस्थेच्या ३९ शाळांमधुन १ हजार ५७७ विद्यार्थी दहावी परिक्षेला बसले होते त्यापैकी १ हजार ५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाच वर्षापासून १०० टक्के निकाल देणारे आष्टीचे पं.नेहरु विद्यालय... ------------------- शेतकरी शिक्षण संस्था संचलित आष्टी शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे.या शाळेतुन १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते सर्वची सर्व उत्तीर्ण झाले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी सांगीतले.पं.नेहरू विद्यालयाने १० वी.बोर्ड परीक्षेत राखली यशाची परंपरा कायम, १२ वि‌द्यार्थ्यांनी घेतली उत्तुंग गरुडझेप घेतली.पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालयाचे १८८ वि‌द्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९० ते १०० टक्के गुण संपादन करणारे ५९ विद्यार्थी,८० ते ९० टक्के गुण संपादन करणारे ५६ विद्यार्थी, ७० ते ८० टक्के गुण संपादन करणारे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी सांगीतले.आदित्य सुरेश बोडखे १०० टक्के,आदित्य रविंद हुमे १०० टक्के,कु. वैष्णवी बापूराव कुत्तरवाडे १०० टक्के (समान गुण सर्वप्रथम) कु.समृध्दी चंद्रकांत बन्सोडे ९९.४० टक्के (व्दितीय) कु.पवार गौरी प्रविण ९९ टक्के (तृतीय), कु.तनिष्का प्रदिप धोंडे ९८.८० टक्के, सोहम अशोक फुंदे ९८.६० टक्के, ओमकार सुभाष गिरी ९८.६० टक्के, कु.वृषाली लक्ष्मण टकले ९८.६० टक्के, कु.भक्ती मोहन झगडे ९८.४० टक्के, विश्वप्रताप अशोक सिरसाट ९८.२० टक्के,कु.प्राजक्ता ज्ञानेश्वर राऊत ९८ टक्के,सिध्दि चंद्रकांत बान्सोडे ९६.६० टक्के गुण संपादन करून यशाची गरूड झेप घेतली आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, डॉ.अजय धोंडे, अभय धोंडे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे,प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी. राऊत,प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,दत्तात्रय गिलचे,संजय शेंडे, पं.नेहरु विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे व सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ------------------ श्रीराम विद्यालय कडा ------------------- कडा येथील श्रीराम विद्यालयाचा १० वी. मार्च २०२५ परीक्षेचा एकूण वार्षिक निकाल ९९ टक्के निकाल लागला आहे.या विद्यालयातुन दक्ष विठ्ठल गोरे सर्वप्रथम आला आहे.श्रीराम विद्यालयातुन दक्ष विठ्ठल गोरे ( ९६.८० टक्के सर्वप्रथम), शेख सुहाना युनुस (व्दितीय ९४.८० टक्के),रोहन गुरुदेव नवले ९४.८० टक्के) विशेष प्राविण्य ६१ तर प्रथम श्रेणी १६ तर व्दितीय श्रेणी १० असा निकाल लागला आहे. ------------------- श्री गणेश विद्यालयाचा १०० टक्के निकाल.. ------------------ आष्टी शहरातील श्री गणेश विद्यालयाचा १०० टक्के निकाल - आदित्य आण्णासाहेब वांढरे ९६.६० टक्के ( समान गुण प्रथम), कु.पायल शिवाजी वांढरे -९६.६० टक्के (समान गुण प्रथम), टकले कृष्णा लक्ष्मण ९४.२० टक्के (व्दितिय),पोकळे ओमराज कान्हू -९३.२० टक्के (तृतीय),कु.मोरे अस्मिता अंबादास -९२.४० टक्के, कु.भवर साक्षी वैजिनाथ ९२ टक्के,कु.पठाण जैनब आसिफ ९१.८० टक्के,पोकळे करण शहाजी ९१.४० टक्के असे गुण मिळले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. ------------------ हरिनारायण स्वामी विद्यालय क-हेवाडी ------------------ आष्टी तालुक्यातील किसान शिक्षण संस्था संचलित क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचा १० वी. परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल ९६ टक्के लागला आहे.सांगळे आकांक्षा रामदास ९३.६० टक्के (प्रथम),सांगळे शुभांगी शिवाजी -९२.८० टक्के (द्वितीय),सांगळे कोमल बाबासाहेब -९०.२० टक्के (तृतीय) सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक,पालकांनी अभिनंदन केले. ------------------ शृंगेरी विद्यालयाचा १०० टक्के निकाल ; संस्कृती आजबे प्रथम ----------------- आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे शृंगेरी विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.१० वी. परिक्षेला ४० विद्यार्थी बसले होते ते सर्वची सर्व उत्तीर्ण झाले.संस्कृती हनुमंत आजबे ८८.२० टक्के (प्रथम),गायत्री शिवराम वायकर ८८ टक्के (व्दितीय), सेजल संदीप पानसांडे ८६.२० (तृतीय),तनिष्का अजय निंबाळकर (चतुर्थ) आले आहेत. --------------- मातकुळीच्या श्रीकृष्ण विद्यालयाची १० वी.१०० टक्के निकाल ------------------ मातकुळीचे श्रीकृष्ण विद्यालयाचा १०० टक्के निकाल.. --------------- आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे श्रीकृष्ण विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.माजी सरपंच अनिल पाटील यांची नात कु.गौरी आबासाहेब पाटील ९१.४० टक्के (प्रथम),प्रतीक्षा गजेंद्र आरेकर ९०.८० टक्के (व्दितीय),मनीषा महादेव आढाव ९०.८० टक्के (व्दितीय),माधुरी मनोज आढाव ९०.४० टक्के (तृतीय),डोके वैष्णवी युवराज डोके ९०.४० टक्के (तृतीय) आले आहेत.नियमीत ३१ विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांनी गणित विषयात उच्च गुणवत्ता प्राप्त केली आहे.९ विद्यार्थी गणित विषयात ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेतले.१०० पैकी ९७ गुण घेऊन कु.माधुरी आढाव ही गणित विषयात सर्वप्रथम आली आहे.क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करून शाळेचे संघ राज्यस्तरापर्यंत घेऊन जाणारे संगीत व गणित विषयाचे शिक्षक अशोक डोके सर यांचे मातकुळी ग्रामस्थांनी व संस्थेने विशेष अभिनंदन केले आहे.
------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या