Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रात वाहून घेतलेली‌ जोडी... .................. नवोदय,मंथन,शिष्यवृत्ती परीक्षेत गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे यश

आष्टी ( प्रतिनिधी अकरा वर्षापासुन गरीब होतकरू हुशार ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे योगदान देत नॉलेज प्लांटच्या माध्यमातून स्कॉलरशिप देऊन अल्प फीस मध्ये त्यांना विविध परीक्षातील यशापर्यंत पोहोचवण्याची प्रमाणिक जबाबदारी घेतलेले जायभाये दांपत्य सर्वांच्या आपुलकीचा विषय झाले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताचे औचित्य साधत नॉलेज प्लांटच्यावतीने विविध परीक्षा घेऊन त्यातून गुणवंत निवडलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपात बक्षिसाची रक्कम देऊन त्यांच्या मध्ये शिकण्याची आवड आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी गेल्या एक दशकापासून त्यांचा प्रयत्न आहे.बीड शहरातील जुना चर्हाटा रस्त्यावरील इमारतीमध्ये मुख्य संचालक आणि जिजाऊ सावित्रींची लेक सौ. गीतांजलीताई जायभाये यांच्या कल्पक नियोजनातून नॉलेज प्लांटची निर्मिती झाली.या माध्यमातून त्यांनी विशेषतः ग्रामीण गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून विशेष उपक्रम राबवले आहेत.याचा परिणाम म्हणून त्यांचे विद्यार्थी नवोदय मंथन विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवू शकलेले आहेत.हा यशाचा आलेख सर्वसामान्यांसाठी प्रेरणेचा ध्वज निर्माण झाला असून गणित तज्ञ विठ्ठल जायभाये यांच्या मार्गदर्शनाने यशवंत आणि गुणवंतांचा यशाचा नॉलेज प्लांटचा आलेख वाढला आहे; याबद्दल त्यांचे नुकतेच एका कार्यक्रमामध्ये विशेष कौतुक केल्याचे गुलाब चव्हाण यांनी सांगितले. चौकट -------- गरीब,होतकरू विद्यार्थ्यांना आशेचा किरण! --------------------------- बीड शहरामध्ये एक दशकापासून नॉलेज प्लांटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब होतकरू मुला मुलींना मार्गदर्शन केले जाते. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने परिक्षेत उच्च गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्यासह आर्थिक स्वरूपाची मदत करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे, हा केवळ कर्तव्याचा भाग असल्याचे मुख्य संचालक सौ. गीतांजलीताई जायभाये यांनी सांगितले. --------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या