
आष्टी (प्रतिनिधी)
अंबिका नवनाथ सानप या दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत २ लाख रुपयांचा धनादेश आष्टी येथील
शाखाधिकारी राकेश साही यांच्या हस्ते प्रदान करून आर्थिक आधार देण्यात आला. या
योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी राकेश शाही
यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी
मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात उपप्रबंधक शिवनाथ राऊत यांनी योजनांचे
महत्त्व नमूद करत नागरिकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.फक्त
४३६ रु वार्षिक हप्त्यावर उपलब्ध असलेल्या या विमा योजनेतून मिळालेली २ लाख रु चा
धनादेश सानप कुटुंबाच्या वडील व वारसदार नवनाथ सानप यांच्याकडे सुपूर्द करण्यात
आला.वितरण प्रक्रियेमध्ये इमरान पठाण, अभिजीत भोज आणि मोहसिन शेख यांचे योगदान
राहिले. कार्यक्रमाचे आयोजन बँकेने केले होते.धनादेश बँकेचे ग्राहक आणि गवारे
कलेक्शनचे मालक अंबादास गवारे यांच्या हस्ते देऊन बँकेने या शाखेत ग्राहकांना
असलेले महत्व अधोरेखित केले.यावेळी अण्णा साबळे हे उपस्थित होते. विमा योजना ही
केवळ कागदावरील योजना नसून,दुःखाच्या क्षणी कुटुंबासाठी आशेचा किरण ठरते.स्टेट बँक
ही कायम लोकोपयोगी कार्य करण्यास पुढाकार घेत असते.आपण सामाजिक बांधिलकी जपण्यात
आघाडीवर आहोत हे स्टेट बँकेने दाखवून दिले आहे.
0 टिप्पण्या