

आष्टी (प्रतिनिधी)
श्री संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन होऊन ३७५ वर्ष झाली
आहेत.त्यानिमित्ताने संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र कथा व गाथा पारायण आष्टी
तालुक्यातील घाटा पिंपरी येथे सुरु आहे.संत मदन महाराज बिहाणी यांच्या आशीर्वादाने
आणि ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सप्ताह सुरु
आहे.या सप्ताहात ह.भ.प.रामायणाचार्य संतोष महाराज मोरे (श्री क्षेत्र आळंदी देवाची)
यांची संगीत संत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा सुरु आहे.ह.भ.प.संपत महाराज दानवे
(संगीत विशारद),हंसराज महाराज मगर,सिंथेसायझर वादक ह.भ.प.कृष्णा महाराज भांड,तबला
वादक ह.भ.प. देविदास महाराज कुटे यांची साथ संगत लाभत आहे.उद्या शनिवार दि.२४
मेरोजी दुपारी ११ ते १ यावेळात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा समाज
प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहिर हरिकीर्तन होत
आहे.शनिवारी रात्री आळंदीचे ह.भ.प.श्रीनिवास घुगे यांचे हरिकीर्तन होणार आहे.या
कीर्तनाचा भावीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ घाटा
पिंपरी यांनी केले आहे. या सप्ताहात काकडा भजन,विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण,
दररोज दु.३ ते ५ श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा सुरु आहे.हरिपाठ,
अन्नप्रसाद,रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होत आहे.या सप्ताहात ह.भ.
प.गणेश महाराज पाटील (श्री क्षेत्र पंढरपूर), ह.भ.प.सुधाकर महाराज वाघ (श्री
क्षेत्र पैठण),ह.भ.प.सोमिनाथ महाराज पाटील (श्री क्षेत्र आळंदी देवाची),ह.भ.प.
शहाजी महाराज मोरे (श्री क्षेत्र गाथा मंदिर,देहू),ह.भ.प. संग्राम बापू महाराज
भंडारे (श्री क्षेत्र आळंदी देवाची) यांचे हरिकीर्तन झाले.आज शुक्रवार दि.२३ मे
रोजी रात्री ह.भ.प.स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत (श्री क्षेत्र गेवराई) यांचे
हरिकीर्तन होणार आहेत.उद्या शनिवार दि.२४ मे रोजी धर्माचार्य,समाज प्रबोधनकार
ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांचे सकाळी ११ ते १ यवेळात हरिकीर्तन
होणार आहे.श्री संत मदन महाराज बिहाणी यांनी ५५ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा अखंड
हरिनाम सप्ताहचा आता वटवृक्ष झाला आहे.दि.२५ मे रोजी सकाळी ग्रंथराज
ज्ञानेश्वरी,अभंग गाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत मदन महाराज यांच्या प्रतिमेची आणि
ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल महाराज यांची टाळ- मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य
मिरवणूक झाली.दि.२५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संत मदन महाराज संस्थान कडा व
गुरुकुल आश्रम धामणगांवचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे
सुश्राव्य हरिकिर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल.ह.भ.प.बबन महाराज
बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तनास खा.बजरंग सोनवणे, आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव
धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष शेख मेहबुब,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. सविताताई
गोल्हार,डॉ.शिवाजी राऊत,सतिषआबा शिंदे, आण्णासाहेब चौधरी,ॲड. हनुमंत थोरवे,पत्रकार आदि
विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत.
-------------------------------
0 टिप्पण्या