

लग्नाचा वाढदिवस कितवा माहित नाही पण तुमचे ५९ वय
झाले तरी अगदी तरुणाला लाजवेल अशी
दिनचर्या असणारा सेवानिवृत अधिकारी....
अशोक खेडकर साहेब ...
आष्टीकरांचे मित्र
म्हणुन राहिले. कधीच मोठापणा मिरविला नाही उपअभियंता असल्याचा गर्व केला नाही. आज
आपल्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त दोन शब्द .... एक अभ्यासु , हुशार आणि कर्तव्यकठोर
अधिकारी अशोक खेडकर साहेब ... मनुष्य जन्माला येतो परंतु माणुसकी निर्माण करावी
लागते! असे म्हणतात. मानवी जीवनामध्ये 'एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ!' या
सहकाराच्या घोषवाक्यानुसार आपुलकी, ऐक्य, बंधुत्व या मूल्यांच्या माध्यमातून जीवन
जगतानाही या तत्वाला धरून प्रशासनात राहूनही निव्वळ अधिकार पदाचा बडेजाव न आणता
सर्वसामान्य माणसांना प्रशासनाबद्दल प्रेम वाटावे असे कार्य करणारे कर्तव्य कठोर
अधिकारी म्हणून राहिले.आता सेवानिवृत झाले असुन आत अत्याधुनिक शेती अशोक खेडकर
यांनी आष्टीता सन्मानाने सेवाकाल घालविला. करणे उचित सेवानिवृत उपअभियंता अशोक
खेडकर हे आष्टी येथील कर्तव्यदक्ष, आणि अभ्यासू उपविभागीय अधिकारी म्हणून
राहिले.लघु पाटबंधारे उपविभाग भूम आणि मुख्यालय आष्टीचे उपविभागीय अधिकारी म्हणून
अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले आहे. दि.२० ऑक्टोबर १९६५ साली जन्म पाथर्डी येथे
झाल्यानंतर लहानपणा पासूनच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीनुसार जिद्द,चिकाटी
आणि आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यात उत्तम कार्य करू शकेल अशी स्थिती त्यांच्या
बालपणापासून दिसू लागली आणि म्हणून पहिली ते दहावीचे पाथर्डी येथील शिक्षण
गुणवत्तापूर्ण झाले. दहावीनंतर १९८० ते १९८३ मध्ये तीन वर्षे शासकीय तंत्रनिकेतन
रत्नागिरी येथे तर स्थापत्य पदवीचा जून १९८४ मध्ये त्यांनी पाटबंधारे विभागाचे
शासकीय सेवेत रुजु झाले.शासकीय सेवेत प्रवेश १९८४ ते १९८७ मध्ये झाल्यानंतर गुण
नियंत्रण विभाग पुणे येथे त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली. जून १९८४ १९८७ मध्ये
त्यांनी उत्तम कार्य केले. १९८७ ते १९८९ मध्ये महाराष्ट्र जल वापर प्रकल्प विभाग
नेवासा येथे कर्तव्य केले तर १९८९ ते १९९५ या सहा वर्षांमध्ये जलसिंचन व्यवस्थापन
मुळा एरिगेशन विभाग शाखा माका पिंपळगाव येथे तर १९९५ ते २००० मध्ये सिंचन
व्यवस्थापन पुणे पाटबंधारे विभाग पुणे,टाकळी कडेवळीत श्रीगोंदा तसेच घोड धरण चिंचणी
शिरूर येथे २००० ते २०१० मुळा इरिगेशन विभाग अहमदनगर येथे उत्तम कार्य केले.
पाथर्डी शाखा कालवा माका शाखा येथे २०१० ते २०१९ मध्ये आष्टी उपसासिंचन योजना
आष्टी,अहमदनगर उपविभाग उस्मानाबाद वडीगोद्री औरंगाबाद विभाग आणि २०२१ च्या
ऑक्टोबरमध्ये पदोन्नतीने ते आष्टी उपसा सिंचन योजना आष्टी उपविभागाचे वरिष्ठ
अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे.शाखा अभियंता पदावर तब्बल ३५ वर्ष पाटबंधारे
विभागामध्ये ते जनतेचे काम करू शकले.वडील अहमदनगर जिल्हा परिषदेचे १० वर्ष प्रभावी
जि.प.सदस्य होते.प्रसिद्ध वकील म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पोटी
अशोकाच्या उंच झाडाप्रमाणे स्वतःची झेप घेत राहिले परंतु आपल्या फांद्या मात्र त्या
जन्मभूमी आणि कर्मभूमीशी कायम अतूट राहिल्या. राष्ट्रसंत भगवानबाबा,संत वामनभाऊ आणि
खंडुबाबा यांच्या विचारांचा प्रभाव अशोक खेडकर साहेब यांच्या बोलण्यात नेहमीच
जाणवतो.त्यांच्या स्वभावाला धार्मिक अधिष्ठान आहे. समाजातील रूढी, परंपरा सण
उत्सव,याला बाधा न पोहोचू देता ते अंधश्रद्धेला विरोध करताना दिसतात. लग्न
समारंभातील बडेजावपणा,पूजा अर्चा,व्रत वैकल्य यामध्ये समाजाने गुंतून न पडता,व्यर्थ
खर्च न करता आपल्या कुटुंबाची उन्नती करावी असं नेहमी त्यांना वाटत. शेतकऱ्याचा
पिंड असल्याने शेतकऱ्यांबद्दल त्यांना नेहमीच कळकळ वाटते. शेतकऱ्यांच्या मुलांनी
शिकावं,मोठं व्हावं,नावलौकिक करावा याबाबत खेडकरसाहेब नेहमीच आशावादी राहिले
आहेत.आष्टी उपसा-सिंचन योजना आष्टी उपविभागात अशोक खेडकर यांची पाटबंधारे विभागाचे
उपविभागीय अधिकारी भुम ,मुख्यालय आष्टी येथे पदोन्नती झाली होती.आज त्यांच्या
लग्नाचा वाढादिवस आहे. पत्नी व मुलगा ॲड.प्रतिकदादा खेडकर यांची त्यांना खंबीर साथ
आहेच... सेवानिवृत उपअभियंता अशोक खेडकर साहेब व वहिनींना दैनिक झुंजारनेता
परिवाराचेवतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....
-- उत्तम बोडखे,
(दैनिक झुंजारनेता
उपसंपादक)
(आष्टी)
----------------
0 टिप्पण्या