आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या ४० वर्षापासून सातत्याने आष्टी तालुक्यातील ग्रामीण
भागामध्ये गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांची मुले शिकावीत हा शाहू
महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेत गावोगावी शाळा,कॉलेज स्थापन करून माजी
आ. भीमराव धोंडे यांनी सर्वांगीण विकासाचे द्वार खुले केले आहे. दरम्यान नुकतीच
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेस इंजिनिअरिंग पदवी कॉलेजची मान्यता
मिळाल्याने आष्टी तालुक्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.गेल्या अनेक वर्षापासून
माजी आ.भीमराव धोंडे यांनी तालुक्यामध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या
माध्यमातून ५० हून अधिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये,पॉलिटेक्निक
कॉलेज,अन्न व कृषी तंत्र महाविद्यालय,बी.एच.एम.एस, बी.ए.एम.एस.,बी.पी.एड,
बी.एड.,डेअरी काॕलेज,कृषी तंत्र विद्यालय,कृषी महाविद्यालय आदी सह विविध शिक्षण
संस्थांच्या रूपाने सर्वसामान्यां साठी स्वावलंबी जीवनाचा मार्ग दाखवला आहे.या
त्यांच्या शिक्षण संस्थांमधून हजारो मुले शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
स्वावलंबी जीवन जगत आहेत.त्यांच्यासह त्यांची पिढी माजी आ.भीमराव धोंडे यांना
धन्यवाद देत आहेत. नुकतेच शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज या पदवी
अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाल्याने माजी आ.भीमराव धोंडे यांची स्वप्नपूर्ती झाली
आहे.मात्र भविष्यात कॅन्सर रुग्णालय ( ५०० खाटांचे १०० कोटी रु.खर्चुन) उभारण्याचा
मनोदय असल्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना सांगितले.
दरम्यान, शिक्षणमहर्षी माजी आ. भीमराव धोंडे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती
केली आहे. सर्वसामान्यांची मुले योग्य मार्गाला जाऊन सर्व शिक्षण आष्टीसारख्या
ग्रामीण तालुक्यात उपलब्ध करून नवा इतिहास रचण्यात आला आहे. नुकताच अखिल भारतीय
तंत्रशिक्षण परिषद दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्यावतीने भीमराव धोंडे यांच्या अथक
परिश्रमाला प्रतिसाद देत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ महेश इन्स्टिटयूट ऑफ
इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टी या पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला मान्यता
दिल्याने सबंध तालुक्यातील शिक्षण प्रेमींनी माजी आ. भीमराव धोंडे यांना अभिनंदन
करून धन्यवाद दिले आहेत.
चौकट
----------
मान्यता मिळालेले अभ्यासक्रम स्थापत्य
अभियांत्रिकी,संगणक अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल
अभियांत्रिकी, ,
आर्टिफिसिअल इंटिलिजन्स अँड डाटा सायन्स,प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता
चौकट
------
५०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय
उभारण्याचा मनोदय!
---------------------------
माजी
आ.भीमराव धोंडे यांचे वडील कै.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी हे कॅन्सर रोगामुळे मृत्यू
पावले.याची सल कायम धोंडे यांच्या मनात आहे आणि म्हणून इथून पुढे परिसरातील एकही
कॅन्सर रुग्ण या रोगाने मृत्यू पावला जाऊ नये,यासाठी भविष्यात भव्य ५०० खाटांचे
अद्यावत कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येईल असा मनोदय माजी आ.भीमराव धोंडे यांनी
व्यक्त केला आहे.

---------------------------
0 टिप्पण्या