Ticker

6/recent/ticker-posts

युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड पंचायत समितीत रणजित राऊत यांचा सत्कार संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) रणजित राऊत यांना संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथे पार आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेत "युवा शास्त्रज्ञ पुरस्कार" मिळाल्याबद्दल जामखेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानाची पावती आहे.या सत्कार समारंभात तालुका पशुधन पर्यवेक्षक डॉ. जयंत चव्हाण,डॉ.खेत्रे, रमेश धोत्रे, तालुका समन्वयक उमेद, महिला व बालकल्याण विभाग, समाजसेवक जयेश कांबळे, पत्रकार प्रियंका शेळके पाटील, समाजसेविका अनिता ढोले पाटिल,डॉ.क्षीरसागर,डॉ. आकाश खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रणजित राऊत यांनी जैवतंत्रज्ञान, वन्यजीव, प्राणीशास्त्र, जैवविविधता संरक्षण व संवर्धन आणि शाश्वत शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय संशोधनामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशामुळे जामखेड तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.जामखेड पंचायत समितीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या