Ticker

6/recent/ticker-posts

कु.संस्कृती जेव्हा " राजमाता अहिल्यादेवी होळकर " होते तेव्हा!

आष्टी (प्रतिनिधी)
आपल्या कणखर मजबूत आणि पराक्रमी बाण्याने सबंध आसमंतात तेजस्वी इतिहास घडवणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व देशभर लोकप्रिय झालेले आहे.त्यांच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास आजही महिला भगिनींना जगण्याची उर्मी बळ ऊर्जा आणि प्रेरणा देतो.त्यांच्याच या कार्याला स्मरून अगदी त्यांच्यासारखीच " वेशभूषा " परिधान करून आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील कु.संस्कृती सिद्धेश्वर शेंडगे हिने उपस्थितांना चकित केले आहे. कु.संस्कृती सिद्धेश्वर शेंडगे ही विद्यालयात असणारी अत्यंत अभ्यासू,शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट कलावंत आहे.तिने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची अत्यंत हुबेहूब "वेशभूषा" करून छायाचित्रकाराला पोज दिली.कु.संस्कृती शेंडगे ही आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील रहिवासी असून शिक्षक नेते सिद्धेश्वर शेंडगे यांची कन्या आहे.आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची उबेहूब केलेली वेशभूषा सर्वांसाठी अत्यंत आकर्षणाची बाब राहिली आहे.हे छायाचित्र पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला राजमाता अहिल्यादेवी होळकर साक्षात पुढे असल्याचा क्षणभर भास होतो.दरम्यान,कु.संस्कृती शेंडगे या गुणवंत कलावंत भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्कृतीला भविष्यातील यशदायी प्रवासाला दैनिक झुंजारनेताच्या हार्दिक शुभेच्छा... -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या