

विशेष लेख
----------------
प्रा.बिभिषण चाटे
------------------
मैत्री हे एक जीवनातील अत्यंत मौल्यवान नाते आहे! किंबहुना मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने आनंददायी बनवण्या साठी मैत्रीचे नाते घट्ट असण्याची गरज आहे.मैत्रीच्या माध्यमातून अनेक वेळा अडचणीवर मात करता येतेच.. किंबहुना सुख आणि दुःखात सहभागी झाल्याने जीवनाला नवी ऊर्जा शक्ती बळ प्राप्त होते.घट्ट मैत्रीचे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील ऐतिहासिक दृष्ट्या अनेक उदाहरणे आहेत.आजही छोट्या-मोठ्या कुटुंब संस्था आणि इतरत्र घट्ट मैत्रीने आनंदी जीवन जगणारे अनेक जण प्रेरणास्थान बनून राहिले आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये दैदिप्यमान स्थान निर्माण केलेले स्व.मोतीरामजी वरपे (दादा) यांच्या अथक परिश्रमातून दैनिक झुंजारनेताच्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्षात रूपांतरित झालेला हा महाकाय ज्ञानाचा आणि माहितीचा खजाना अर्थात " दैनिक झुंजारनेता " हे वृत्तपत्र आहे.दैनिक झुंजारनेताचे संस्थापक संपादक मोतीराम (दादा) वरपे यांच्या नंतर स्व.रत्नाकर वरपे (भाऊ),निवासी संपादक स्व.श्रीपती मानेसाहेब आणि सद्यस्थितीमध्ये दैनिक झुंजारनेताची अत्यंत सक्षमपणे बाजू सांभाळणारे युवा संपादक अजितदादा वरपे यांच्या रूपाने अत्यंत दमदार वाटचाल सुरू आहे.या वाटचालीत त्यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनापासून अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच उद्योजक, लेखक,पत्रकार, कार्यकर्ते यांना मित्र बनवून चौफेर यशाची निर्मिती अत्यंत दमदारपणे केली.या साऱ्या प्रवासात दैनिक झुंजारनेता परिवारामधील एक मैत्रीचे घट्ट नाते निभावणारे आणि या मैत्रीला निस्वार्थ, निखळ,शाश्वत, अजीव मैत्रीचे " उत्तम " प्रतिबिंब आणि केंद्रस्थान बनलेले संपादक अजितदादा वरपे आणि वरिष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या मैत्रीच्या नात्याचा गोड,विशेष संदर्भ आज अजितदादा वरपेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देता येईल.
संपादक अजितदादा वरपे यांनी अत्यंत बालपणापासून स्व.मोतीराम दादा वरपे यांची पत्रकारिता क्षेत्रातील चिकाटी,जिद्द आणि प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता सातत्याने पाहिली तर याच काळामध्ये आष्टीहून पत्रकारिता करणारे आणि झुंजारनेताच्या परिवारातील एक सदस्य बनलेले उत्तम बोडखे एक लेखनी क्षेत्रातील दीपस्तंभ दैनिक झुंजारनेताच्या सुखदुःखात सातत्याने स्वतःला झोकून देत लेखनीचे जीवन समर्पित करीत राहिले...
दैनिक झुंजारनेताच्या वाढ, संवर्धन व विकासामध्ये अजितदादा वरपे आणि उत्तम बोडखे या संपादक आणि उपसंपादक या द्वयींनी गोरगरीब, दिन दलित,दुबळ्या अनाथ,अपंग,शेतकरी,शेतमजूर,वंचित, घटकांसह ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना सातत्याने अग्रक्रमाने लेखणीतून शब्दबद्ध करून शासन दरबारी ते दुःख मांडून सोडवण्यासाठी नेहमी महत्त्वाची भूमिका केली. त्यातून अनेक प्रश्न सुटण्यास मदत ही झाली तर अनेकांच्या यश आणि आनंदाचा क्षण आणखी सदाबहार करण्यातही त्यांची लेखणी कधी कचरली नाही.
बीड जिल्ह्यात ३० वर्षापेक्षा अधिक काळ एकमेकांच्या वैचारिक सोबत राहून अत्यंत संवेदनशील मनाने मैत्रीचे संवेदनशील नाते जपून या दोघांचा असलेला प्रवास लेखक वाचक चळवळीत नक्कीच कौतुकास्पद आहे.
चौकट
--------
नुकताच दैनिक झुंजारनेताचे युवा संपादक अजितदादा वरपे यांचा अभिष्टचिंतन दिन सर्वसामान्य गोरगरीब, वाचकांच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाने आणि प्रार्थनेने संपूर्ण झाला.हा लाखो जणांचा आशीर्वाद झुंजारनेताच्या कायम पाठीशी राहावा अशी अपेक्षा उपसंपादक आणि वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी आज यानिमित्ताने व्यक्त केली आहे.संपादक अजितदादा वरपे आणि उपसंपादक उत्तम बोडखे यांची अतूट,निखळ,
निस्वार्थ,अजीव, प्रेरणादायी मैत्री अशीच बहरत राहो.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
--- प्रा.बिभिषण चाटे.
(साहित्यिक,बीड)
-------------------
0 टिप्पण्या