
हिंदु-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत मौलाली बाबांचा उरूस
(यात्रा) उत्सव बुद्ध पौर्णिमेपासून ( सोमवार दि.१२ मे पासुन) सुरू होत आहे.हा
उत्सव १५ दिवस सुरु राहणार आहे.आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा यात्राउत्सव म्हणून
याकडे पाहिले जाते.भाविक रखरखत्या उन्हात न्हाऊन निघणार आहेत.कडा येथील कडी नदीच्या
तीरावर सर्वधर्म पंथीयांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून हजरत मौलाली बाबांचा दर्गा
प्रसिद्ध आहे. या दर्ग्याच्या महती ऐतिहासिक काळापासून कडेकरांनी जपली आहे.
याठिकाणी वर्षातून एकदा म्हणजे बुद्ध पौर्णिमेला हिंदू- मुस्लीम बहुसंख्येने एकत्र
होऊन हा उत्सव साजरा करतात.याला शेकडो वर्षांचा इतिहास साक्षीदार आहे.हा उत्सव
बुद्ध पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होणार आहे. यासाठी हजारो भाविक बाहेर गावातून
कड्यात येऊ लागले आहेत. कडी नदीच्या तीरावर मनमोहक असा अतिसुंदर बाबांचा दर्गा आहे.
यात्रेनिमित्त रंगीबेरंगी रोषणाई करण्यात येते. यात्रेसाठी कडा गावचे रहिवासी
कामधंदा किंवा नोकरीसाठी बाहेरगावी स्थायिक झालेले सर्व कडेकर घरातील एखाद्या
कार्याला येणे टाळतात परंतु यात्रेसाठी हमखास येतात.हे विशेष म्हणावे लागेल.
यात्रेच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या चादरीची
मिरवणूक काढत नवसपूर्ती बाबांच्या चरणी अर्पण करतात.या चादरींची मिरवणूक आकर्षक
असते. सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मुख्य यात्रेला सुरुवात
होणार आहे.चांदण्या रात्रीत छबिना मिरवणूक फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडणार आहे.
कडा येथे मौलालीबाबा यात्रेनिमित्त
कुस्त्यांचा जंगी मुकाबला होणार
----------------
हिंदु-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडा येथील
मौलाली बाबांची यात्राउत्सव बुद्ध पौर्णिमेपासून सुरू होणार आहे.हा उत्सव १५ दिवस
चालणार आहे.आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणून याकडे पाहिले जात
आहे. पोर्णिमेच्या चांदण्या रात्रीत भाविक न्हाऊन निघणार आहेत.कडा येथील कडी
नदीच्या काठावर सर्व धर्म पंथियांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून मौलाली बाबांचा दर्गा
आहे.या दर्ग्याच्या महती ऐतिहासिक काळापासून जपली आहे.या ठिकाणी वर्षांतून एकदा
म्हणजे बुद्ध पौर्णिमेला हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र सहभागी होऊन हा उत्सव
साजरा करतात.याला शेकडो वर्षांचा इतिहास साक्षीदार आहे. हा उत्सव सोमवारपासून सुरू
झाला आहे.यासाठी हजारो भाविक कड्यात दाखल झाले आहेत. यात्रेत मनोरंजन करण्यासाठी
विविध प्रकारचे कार्यक्रम आले आहेत. त्यात शंभर फुटी रहाट पाळणा,मौत का कुंआ,
सर्कस, पन्नालाल,भौरवी जादूगार असे एक से बढकर एक कार्यक्रम मनोरंजन करतात.विविध
प्रकारचे खेळणीची दुकाने,मिठाई स्टॉल दाखल झाले आहेत. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी
म्हणजे मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी कुस्त्यांचा जंगी मुकाबला येथे होणार
आहे.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. हा उत्सव संपूर्णपणे
लोकवर्गणीतून साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच,उपसरपंच, सर्व
सदस्य,यात्रा कमिटी परिश्रम घेत आहे. कडी नदीच्या तीराबर मनमोहक असा अतिसुंदर
बाबांचा दर्गा आहे.यात्रेनिमित्त भव्यदिव्य अशी रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली
आहे.यात्रेसाठी कामधंदा किंवा नोकरीसाठी बाहेरगावी स्थाईक झालेले सर्व कडेकर घरातील
एखाद्या कार्याला येणे टाळतात परंतु यात्रेसाठी हमखास येतात हे विशेष म्हणावे
लागेल. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळ पासून ढोलताशांच्या गजरात विविध रंगाच्या
फुलांनी सजविलेल्या चादरीची मिरवणूक काढत बाबांच्या चरणी अर्पण करतात.या चादरीची
मिरवणूक एक मोठे आकर्षण असते. विविध तरुण मंडळे यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी
होतात.सायंकाळी छबिना (संदल) मिरवणुकीस प्रारंभ बँड,ढोलीबाजाच्या गजरात होतो. यात
तालुक्यातील नामांकीत बँडचा समावेश असतो. छविण्यावेळी बाबांचा घोडा यामध्ये सामील
असतो.या घोड्याची संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते.त्यावेळी गावातून जाताना
घरोघरीशघोड्याची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मोठी गर्दी
होते.यावेळी साक्षात बाबांचे दर्शन घेतल्याचा मनस्वी आनंद होतो.मिरवणुकी नंतर घोडा
बाबांच्या दारात आणला जातो.त्यावेळी रंगीबेरंगी शोभेची दारू उडवून फटाके फोडून
आतषबाजी केली जाते.ही आतषबाजी पाहण्यासाठी दूर दूरवरून लोक येत असतात . आष्टी
तालुक्यातील सर्वात शेवटची कड्याची याञा असते. बुध्दपोर्णिमा (वैशाखी पोर्णिमा) या
दिवसापासुन ही याञा असते.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मौलाली बाबांची मोठी यात्रा
भरते. कडा येथे मौलाली बाबांचा उत्सव दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात
साजरा केला जातो.या उत्सवास किमान एक लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी असते.१५
दिवस याञा सुरु राहते.परराज्यात गेलेले सर्व कडेकर याञेस हमखास येतात.ग्रामदैवताचे
मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात.यात्रेत रहाट पाळणे,सर्कस,मौत का कुआ,जादूगार,
विविध खेळणी, मिठाईची दुकाने येतात.या यात्रेत दुरदूरवरून अनेक कलाकार येऊन कला
सादर करतात. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत होती.यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या
दिवशी निकाली कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविला जातो.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत
मल्ल येऊन आखाडा गाजवीतात.या आखाड्यात अनेक महिला कुस्तीपटू हमखास हजेरी
लावतात.दूरवरून अनेक पैलवान मंडळी आपल्या कलेचे प्रदर्शन करतात.या यात्रा
उत्सवानिमित्त सहभागी झालेल्या भावीक भक्तांना दैनिक झुंजारनेता परिवाराच्या वतीने
हार्दिक शुभेच्छा....
---उत्तम बोडखे, (आष्टी.)
----------------
0 टिप्पण्या