आष्टी (प्रतिनिधी)
कडा येथील आदर्श शिक्षक शिवाजी ढोबळे यांचे सुपुत्र डॉ.ऋषिकेश
शिवाजी ढोबळे यांनी एम.डी.बालरोग तज्ञ या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन
यश मिळविले आहे. डॉ.ऋषिकेश शिवाजी ढोबळे हा ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याचे
प्राथमिक शिक्षण धानोरा या गावी झाले असून माध्यमिक शिक्षण नवघन राजुरी येथील
सैनिकी शाळेमध्ये झाले.त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय धानोरा या गावी झाले असून त्याने विवेकानंद आयुर्वेद कॉलेज राहुरी येथे
बी.ए.एम. एस.ची पदवी पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज
आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी एम.डी. बालरोग तज्ञ ही पदवी संपादन केली आहे .या यशाबद्दल
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. .जनता वस्तीगृह संस्थेचे सचिव विजय
बांदल,संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल गफूरभाई ,पंचायत समितीचे सदस्य परमेश्वरकाका
शेळके ,माजी सभापती अंकुश चव्हाण ,आजिनाथ शेळके नामदेव मामा शेळके ,राजाभाऊ शेळके
,अनिल ढोबळे,विठ्ठल बांदल ,जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथील
सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या