
विशेष लेख
-----------
उत्तम बोडखे
आष्टी तालुक्यातील वटनवाडी या खेडेगावात दि.४ ऑगस्ट १९७० साली माणिकराव आणि साळुबाई
शिनगिरे या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले सामाजिक कार्यकर्ते भगवान शिनगिरे.
जिद्द,चिकाटी,मेहनत या गुणांच्या जीवावर आज आष्टी तालुक्यातच नव्हे तर बीड
जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात मोठे भरीव असे सामाजिक कार्य केलेले आहे.त्यांचा
तालुका,जिल्हा,विभागीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध
पुरस्कार देऊन गौरव झाला आहे.अशा या आदर्श आणि परोपकारी सेवाभावी वृत्तीच्या
व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा देणारा जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचा विशेष लेख
प्रकाशित करीत आहोत.
----- संपादक
-----------------------------------
भगवान
शिनगिरे यांंच्या कुंटुंबातील सौ.द्वारकाबाई बबन वायकर ही मोठी बहीण तर प्रल्हाद
शिनगिरे,छगन शिनगिरे आणि रघुनाथ शिनगिरे हे तीन भाऊ आहेत.या पाच भावंडात सामाजिक
कार्याची आवड असलेले भगवान शिनगिरे आहेत.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या
उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असल्याने त्यांनी शालेय आणि
महाविद्यालयीन जीवनात समाजसेवा सुरू केली.ती समाजसेवा आज वयाचे ५३ वर्षे झाले तरी
सुरूच आहे.या अखंड सेवाभावी वृत्तीने जगणाऱ्या,समाजसेवेचा हा यज्ञ त्यांनी सुरुच
ठेवला आहे.भगवान शिनगिरे या समाजसेवकाचा विविध क्षेत्रात गौरव होत आहे.राजकीय,
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भगवान शिनगिरे यांचे मोठे नाव झालेले आहे.त्यांनी
वटनवाडी या गावात चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले तर त्यानंतर कडा येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे पुढील
शिक्षण घेता आले नाही. शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे त्यांना समजले आणि उमजले
त्यामुळे त्यांनी बऱ्याच वर्षाच्या खंडानंतर कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी
महाविद्यालयातील बहिस्थ विभागात प्रवेश घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आहे.गेली २२
वर्षपासून भगवान यांनी सामाजिक कार्याला प्रारंभ केला आहे.त्यांचे लहानपणीचे सवंगडी
युवक,ग्रामस्थ,महिला यांची साथ घेऊन सुरुवातीला फक्त समाजसेवा हेच त्यांचे ध्येय
होते परंतु समाजसेवा सुरू असतानाच ग्रामस्थांच्या आणि मित्रांच्या आग्रहाने त्यांनी
राजकारणात प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्यांनी मोठ्या फरकाने विजय
मिळवला होता.भगवान शिनगिरे हे सन २००२ ते ते सन २०१२ असे सलग १० वर्षे सरपंच
राहिले.या सरपंचाच्या काळात त्यांनी ग्रामविकासाचे मोठे काम केलेले आहे.त्यामुळे या
ग्रामपंचायतीला शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.राजकारणात प्रवेश करण्यापुर्वीच
म्हणजेच सन १९९५ साली त्यांनी विवेकानंद सेवाभावी संस्था स्थापन केली. विवेकानंद
सेवाभावी संस्थेमार्फत त्यांनी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक निवासी शाळा सुरू
केली आहे.या शाळेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत.शासनाचा एकही रुपया अनुदान नसताना
स्वतःच्या खिशातील पैशाने ही शाळा सुरू आहे.सुमारे १० एकर स्वतःच्या मालकीची जमीन
विकून म्हणजे सुमारे एक कोटी रुपये खर्चून त्यांनी ही निवासी आश्रम शाळा चालवली
आहे. या शाळेमध्ये अनुसूचित जाती -जमाती,भटके विमुक्त,अनाथ असे सुमारे १८०
विद्यार्थी दरवर्षी येतात.या शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जात
आहे.आजपर्यंत या शाळेतून चार हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.या
सेवाभावी भगवान शिनगिरे यांनी सामाजिक काम करीत असताना आपल्या गावच्या शेतकऱ्यांचा
विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेरी बु. या गावात वटणवाडी गावातील
शेतकऱ्यांची मिळून असलेले सेवा सहकारी संस्था होती.या संस्थेची विभागणी करून
वटनवाडी येथे १९९९ साली विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले.हे ग्रंथालय " ब "
दर्जाचे असून राज्य सरकारच्या यशवंत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत ५ लाख रुपये खर्चून
सन २००४ वटनवाडी येथे भव्य दिव्य ईमारत बांधली आहे.वटनवाडी येथे शेतकऱ्यांना
एकत्रीत करुन विविध सेवा सहकारी संस्थेचे भगवान शिनगिरे यांनी स्थापना केली आहे.या
संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत.भगवान शिनगिरे हे आजपर्यंत म्हणजे २० वर्षापासून
चेअरमन पदावर कार्यरत आहेत.या गावातील शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे
त्यांना अविरोध चेअरमन केले जात आहे. आदर्श सरपंच म्हणून केलेल्या कामांची सामाजिक
संस्था, सेवाभावी संस्था,शासन, प्रशासन यांनी विविध पुरस्कार देऊन भगवान शिनगिरे
यांना गौरविले आहे.या सामाजिक, राजकीय कार्याची दखल आ.सुरेश धस यांनी घेतली
आहे.त्यांनी भगवान शिनगिरे यांना सन २००६ ते २०११ या कालावधीत कडा कृषी उत्पन्न
बाजार समितीचे संचालक म्हणून संचालक मंडळात घेतले. विशेष म्हणजे बाजार समिती संचालक
मंडळाच्या निवडणुकीमध्ये सेवा सहकारी संस्था मतदार संघातून सर्वाधिक मताने विजय
झालेले आहेत.भगवान शिनगिरे यांच्या या परोपकारी आणि पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातील
कार्याबरोबरच सामाजिक कार्य हे मोठे आहे.त्यांच्या योगदानाबद्दल सर्व स्तरातून
कौतुक होत आहे.त्यांच्या या कार्याला त्यांचे पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेले चिरंजीव
किरण संगणक विषयातील पदवीधर असलेली मुलगी हर्षदा शिनगिरे हे भावंडे संस्था
सुरळीतपणे आणि दर्जेदार पद्धतीने शिक्षण देण्यासाठी मदत करतात.विविध पुरस्कारांचे "
शतकवीर " ठरलेले भगवान शिनगिरे हे बीड जिल्ह्यातील पहिले " शतकवीर " असावेत...
सामाजिक कार्यकर्ते भगवान शिनगिरे यांना २००५ ते २०२५ पर्यंत सुमारे १५० पुरस्कार
मिळालेले आहेत. विशेष पुरस्कारांची नावे ----------------------------- राज्यस्तरीय
विश्वनायक भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम राज्यस्तरीय आवाॕर्ड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय सन्मान भूषण जनकल्याण गौरव अवाॕर्ड, शाहूराजे कोल्हापुरी बाणा
आवाॕर्ड,शैक्षणिक सामाजिक कार्य अवाॕर्ड,जीवन गौरव अवाॕर्ड,आदर्श कार्य गौरव
समाजरत्न अवाॕर्ड,आंतरराष्ट्रीय नोबल आवाॕर्ड,राष्ट्रीय समाज सेवारत्न
अवाॕर्ड,राष्ट्रीय समाज सेवारत्न आवाॕर्ड,सामाजिक कार्य अवाॕर्ड,आंतरराष्ट्रीय
स्टार शैक्षणिक अवाॕर्ड,आंतरराष्ट्रीय स्टार शैक्षणिक आवाॕर्ड,नेल्सन मंडेला
आंतरराष्ट्रीय आवाॕर्ड, गोल्डन स्टार अवॉर्ड,राज्यस्तरीय यशवंत रत्न
पुरस्कार,ग्लोबल युथ आयकॉन अवॉर्ड,इंडियन प्राईम अवार्ड,निर्मल ग्राम अवार्ड
,म.गांधी तंटामुक्ती ग्राम,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान,सावित्रीबाई फुले
स्वच्छता अंगणवाडी आवाॕर्ड , शाहू,फुले,डॉ.आंबेडकर स्वच्छ दलितवस्ती
सन्मान,ग्रंथालय सन्मान जिल्हा आवाॕर्ड,राष्ट्रीय एकात्मता समाज भूषण सर्वश्रेष्ठ
सन्मान आदी १५० पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक
कार्याची दखल महाराष्ट्र,भारत आणि भारत देशांबाहेरील देशांनी घेतलेली आहे हे
विशेष... गणेश भगवान शिनगीरे हा मुंबई महानगरपालिका (BMC) येथे कार्यकारी
सहाय्यकपदी कार्यरत आहे तर किरण शिनगिरे वडीलांचा वसा व वारसा चालवित आहे.
सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय कार्य करत आहे. त्यागी आणि म.फुले यांचा
वसा आणि वारसा चालविणा-या आदर्श व्यक्तीमत्वाला व पुरस्कारांचे शतकवीर ठरलेले भगवान
शिनगिरे यांना दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ..... --- उत्तम
बोडखे,आष्टी.
--------------------------
0 टिप्पण्या