Ticker

6/recent/ticker-posts

आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश ;आष्टी आगारात पाच लालपरी दाखल .............. आष्टी शहरातुन नवीन बसेसची फेरी

आष्टी (प्रतिनिधी ) राज्य मार्ग परिवहन महामंडळ आष्टी आगाराचे दररोजचे ७ ते ८ लाख रुपये लाख उत्पन्न असूनही आष्टी आगारातील अर्ध्याहून अधिक बस १० वर्षाच्या पुढच्या आहेत. बसेस वय संपलेल्या असूनही सेवेत आहेत.त्यामुळे नविन बस नसल्यामुळे लांब पल्ल्यांच्या बस सेवा सुरू करता येत नव्हत्या.त्यामुळे प्रवाशांची होणारी हेळसांड होत होती. आ.सुरेश धस यांनी परिवहन मंत्री आणि महाव्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आष्टी आगाराच्या ताफ्यात पाच नवीन लाल परी बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आगाराचा नवीन ऊर्जा मिळणार आहे.आष्टी येथील परिवहन महामंडळ आगारामध्ये नवीन पाच लाल परी बसेस दाखल झाल्या आहेत.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, आगार प्रमुख चोथमल, वाहतुक नियंत्रक हर्षद गुगळे, मच्छिंद्रनाथ बँकेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे,नगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,खंडूदादा जाधव, अजित मुळे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, प्रवीण कदम,शेख शमशोद्दीन,नगरसेवक सुरेश वारंगुळे, नगरसेवक श्याम वाल्हेकर,पत्रकार प्रविण पोकळे,शरद रेडेकर, रघुनाथ कर्डीले, गणेश दळवी, सचिन रानडे,वाहक सचिन काळे, मुख्तार तांबोळी, के.जी. गव्हाणे,राजेंद्र बांगर, रघुनाथ ससाणे,शरद झांबरे,बाबू कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष जिया बेग म्हणाले की,आ.सुरेश धस यांनी आष्टीच्या आगाराकडे सतत लक्ष दिलेले आहे.मध्यंतरी त्यांनी स्वखर्चातून टायर चेंज मशीन आगारासाठी भेट दिले आहे.आता या नवीन बसेस आल्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांची हेळसांड थांबेल असे मत व्यक्त केले.आष्टीच्या आगारातील निम्म्याहून अधिक बसेस जुन्या झाल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे आ.सुरेश धस यांनी परिवहन मंत्री, महाव्यवस्थापक या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधल्यानंतर एस.टी. महामंडळाने तातडीने हालचाली सुरू केल्या.आष्टी आगारासाठी अत्याधुनिक अशा पाच नवीन बीएस-६ गाड्या आज गुरुवारी दुपारी आगारात दाखल झाल्या.या पाचही लाल परींचे (बसेसचे) स्वागत करण्यात आले.आष्टी आगारात आज दुपारपर्यंत बीएस-६ प्रकारच्या पाच नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत.या गाड्यांच्या आगमनानंतर आष्टीकर नागरिक व प्रवाशांच्यावतीने नवीन लालपऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.या पाचही लालपरींची शहरातून फेरी झाली.
--------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या