आष्टी (प्रतिनिधी) अंमळनेर येथील भैरवनाथ विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षक राहुल निकाळजे सर यांना या वर्षीचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मान्यवरांचे हस्ते बीड येथे प्रदान करण्यात आला. रविवारी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन निकाळजे सर यांना सन्मानित करण्यात आले.हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल निकाळजे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.बीड शहरातील पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने मागील १७ वर्षापासून संविधान दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणी जणांचा पद्यपाणि प्रतिष्ठानच्या वतीने पद्मपाणि राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या वर्षीच्या दिल्या जाणाऱ्या विविध राज्य,राष्ट्रीय पुरस्कारसाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत, कर्तुत्ववान गुणीजणांची निवड करण्यात आली होती.यामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आष्टीचे सुपुत्र भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थी प्रिय शिक्षक राहुल निकाळजे यांची निवड करण्यात आली होती.या मानाच्या पुरस्काराचे वितरण रविवारी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमात थाटामाटात विजयराज बंब, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ जयंत राख,वाहतूक शाखेचे जिल्हा पोलीस निरीक्षक सुभाष सानप, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी मैनाताई बोराडे मॅडम,वडवणीचे गटशिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगरे, शालेय संस्थाचे अध्यक्ष उत्तम पवार , शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा यशवंत विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक गणेश वाघ,शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल जाधव,महाविद्यालय खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा साहित्यीक गौतम गायकवाड,पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप तरकसे, प्रतिष्ठानच्या सचिव सिंधुताई तरकसे,सामाजिक कार्यकर्त्या सीमा ओस्तवाल, समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक सहाय्यक आयुक्त कविता गायकवाड, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे,चंपावती विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य हौसराव पवार, रायमोहाचे सरपंच तथा उद्योजक सुभाष क्षीरसागर, भागवत वैद्य,ॲड राजेश तांगडे, प्राचार्य देवीदास निकाळजे, ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार इंगळे, शासकीय निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता जावळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन राहुल निकाळजे यांना सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल निकाळजे सर यांचे भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक मित्र आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले. -------------------