Ticker

6/recent/ticker-posts

घाटशिळा विद्यालयाचा १०० टक्के निकाल

आष्टी (प्रतिनिधी) घाटशिळा विद्यालयातील इयत्ता १० वी.बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून १०० टक्के शाळेचा निकाल तर विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेतल्याने गुणवत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे.घाटशिळा विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.एकूण परीक्षेत ४७ विद्यार्थी होते.त्यापैकी एक अनुपस्थित राहिला. एकूण उत्तीर्ण ४६ एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्केच्या वर गुण घेतलेले विद्यार्थी १४ आहेत तर ७५ ते ९० मध्ये २३ आहेत. प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी ८ आहेत.द्वितीय श्रेणीमध्ये एक आहे. शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी खेडकर प्रवीण अशोक खेडकर ९५.८० टक्के,द्वितीय आलेली विद्यार्थी कु.सानिका भागिनाथ गर्जे ९५.६० टक्के तर तृतीय आलेली विद्यार्थिनी कु.स्वाती निवृत्ती सानप ९४.४० टक्के आहे.हे यश अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचे आणि परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असून विद्यार्थी व शिक्षकांचे पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण बांगर,सचिव सौ.सत्यभामाताई बांगर,युवा नेते विजयसिंह बांगर यांच्यासह मुख्याध्यापक वारभुवन सर, सर्व शिक्षक,प्राध्यापक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या