Ticker

6/recent/ticker-posts

गुत्तेदाराच्या भोंगळ कारभाराने व नियोजनाचा अभावाने आष्टी - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाचे तीन तेरा...

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी-साबलखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम १ एप्रिल २०२३ पासून (दोन वर्षापूर्वी) सुरु झाले आहे.या रस्त्यावरील शेरी बु.येथील पुलाचे काम एक वर्षापासुन संथ गतीने सुरू आहे.याठिकाणी पर्यायी वाहतुक करण्यासाठी नळकांड्या टाकुन पुल बनविण्यात आला परंतु आज शनिवार दि.२४ मे रोजी जोरदार पाऊस झाल्याने हा पुल वाहुन गेला आहे.२० कि. मी.अंतरावरून वाहतुक बदलावी लागली आहे. साबलखेड- आष्टी रस्त्याची गुत्तेदार आणि प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गाचे तीनतेरा वाजविले आहेत.या रस्त्यांच्या कामांकडे आ.सुरेश धस यांनी लक्ष घालून हे काम मार्गी लावण्याची सुचना द्याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे. अहिल्यानगर बीड या राष्ट्रीय महामार्गावर साबलखेड ते आष्टी या १७ कि.मी.अंतराचे सिमेंट रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला तरीही अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत रस्ता पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोणत्या साईटने वाहन चालवावे असा प्रश्न पडत आहे. त्यातच दररोज या राष्ट्रीय महामार्गावर किमान चार ते पाच अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.या रस्त्यावरील शेरी बु.येथील पुलाचे काम एक वर्षापासुन कासव गतीने सुरू आहे. याठिकाणी पर्यायी वाहतुक करण्यासाठी नळकांड्या टाकुन पुल बनविण्यात आला परंतु आज शनिवार दि.२४ मे रोजी आष्टी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हा पुल वाहुन गेला.परीणामी २० कि.मी.अंतरावरून वाहतुक बदलावी लागली आहे.आष्टी ते साबलखेड या मार्गावर पाच ठिकाणी शेरी बु.,कडा, जळगाव,कासारी नदीवर पूल आहेत मात्र यापैकी एकाही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.नदीला पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्ग हा ठप्प झाला आहे.साबलखेड-आष्टी रस्त्याची गुत्तेदार आणि प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गाचे वजवाटोळे केले आहे. या रस्त्यांच्या कामांकडे आ.सुरेश धस यांनी लक्ष घालून हे काम मार्गी लावण्याची सुचना द्याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्गचे अभियंता श्री.राजेंद्र भोपळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. चौकट ---------- या मार्गाचा वाहन चालकांनी वापर करावा -पो.नि.शरद भुतेकर ---------------------------
सर्व प्रवासी व मालवाहू वाहन चालकाकरिता सूचना आष्टी तालुक्यातील शेरी बु.येथील पूल अति पावसामुळे खचला आहे. दुरुस्तीचे काम सुरूअसल्यामुळे आज शनिवार दि.२४ मे रोजी दुपारी २ वाजेपासून आष्टी ते कडा मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील मार्गे वळविण्यात आलेली आहे. अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक आष्टी - बेलगाव - किन्ही - केरूळ - कडा मार्गे आणि आष्टी मार्गे जामखेड, बीडकडे जाणारी वाहतूक कडा - केरूळ - किन्ही - बेलगाव - आष्टी असे आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या