Ticker

6/recent/ticker-posts

उत्तम बोडखे यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणास्त्रोत ....... डॉ.विश्वास मुळे

आष्टी (प्रतिनिधी) कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिल्यानंतर आणि प्रमाणिकपणे निष्ठा,त्याग, आणि प्रचंड घाम गाळून काम केल्यास यश मिळते.या दृष्टीने विचार करता उत्तम बोडखे यांनी त्यांच्या पत्रकारिता या व्यवसायामध्ये प्रचंड त्याग, समर्पण,परिश्रम आणि सकारात्मक वृत्तीतून दिव्य कार्य केलेले आहे.त्यांचे लेखन वाचनीय गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणास्त्रोत आहे अशा शब्दात ज्येष्ठ डॉ.विश्वास मुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वरिष्ठ पत्रकार तथा दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या शब्दगंध अक्षर मित्र आणि वार्ताहर या लेख संग्रहाची सुपूर्तता डॉ.विश्वास मुळे यांना सन्मानपूर्वक करण्यात आली.त्यावेळी आपली प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त करताना डॉ. विश्वास मुळे यांनी पत्रकार उत्तम बोडखे यांच्या शब्द कौशल्य आणि कार्यकर्तृत्वावर शाब्बासकीची थाप देताना बोलत होते.पत्रकार उत्तम बोडखे यांनी ४० वर्षापासून पत्रकारितेची प्रमाणिकपणे सेवा केली आहे हे त्यांचे मौलिक कार्य अनेक पत्रकार घडवण्यासाठी पूरक ठरले आहे. वृत्तपत्रामध्ये काम करताना त्यांनी संत महंत, क्रीडा,शिक्षण,पत्रकारिता, धार्मिक क्षेत्र, वैचारिक आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर बुद्धिवंत आणि गुणवंतांना स्थान देऊन त्यांचे कार्य समाज व्यवस्थेसाठी समोर आणून प्रेरणास्त्रोत ठरावित यासाठी सातत्याने परिश्रम घेतले.त्यांनी अनेक बुद्धिवंतांच्या लेखणीतून साकार झालेले साहित्य त्यांच्या दिवाळी अंकातील तसेच अक्षरमित्र, शब्दगंध यासारख्या लेख संग्रहातून ही मालिका अव्यहातपणे चालू ठेवली.या सर्व अत्यंत मेहनतीने मानवी समाज व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील प्रेरणादायी घटना आणि बाबींना अधोरेखित करीत त्यांचे हे कार्य निश्चितच मौलिक कौतुकास्पद आणि गुणवत्तापूर्ण आहे. हे सर्व मान्य असल्याच्या बाबींवर डॉ.विश्वास मुळे यांनी शिक्कामोर्तब केले. चौकट -------- ' शब्दगंध ' लेखसंग्रहाची लोकप्रियता; वाचकांकडून प्रतिसाद ----------------------- पत्रकार उत्तम बोडखे यांनी गेल्या वर्षभर बीड जिल्हा आणि राज्यभरातील विविध प्रतिभाषाली शब्दप्रभू आणि मान्यवरांच्या लेखणीतून साकार झालेल्या विविध विषयावरील लेखांना एकत्र करून 'शब्दगंध' ची निर्मिती केली.या शब्दगंधातील लेखन, संवेदनशील समाजहितो उपदेशी आणि दर्जेदार आहे!' ----- विक्रम पोकळे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, बीड. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या