



आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालयांचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा फेब्रुवारी २०२५ चा निकाल
जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, विभागीय
मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी दि.५ मे रोजी दुपारी निकाल जाहीर झाला आहे.शेतकरी
शिक्षण संस्थेने निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे.संस्थेच्या १९ शाळांपैकी दोन
शाळांचा १०० टक्के, ८ शाळांचा ९५ टक्केपेक्षा जास्त निकाल लागला आहे. शाळांनिहाय
निकाल पुढीलप्रमाणे ------------------- महेश उच्च माध्यमिक विद्यालय रूई नालकोल
(कला शाखा ९० टक्के), (विज्ञान शाखा ९८ टक्के ),निजाम पटेल उच्च माध्यमिक विद्यालय
मेहकरी कानडी खुर्द,(कला शाखा ९५ टक्के),अश्वलिंग उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळवंडी
(विज्ञान शाखा १०० टक्के तर कला शाखा ६९ टक्के), कला व विज्ञान महाविद्यालय अंमळनेर
(विज्ञान शाखा ९९ टक्के, कला शाखा ९१ टक्के),महिला कनिष्ठ महाविद्यालय पाटोदा
(विज्ञान शाखा ९४ टक्के, कला शाखा ९३ टक्के),नागनाथ उच्च माध्यमिक विद्यालय नागतळा
(कला शाखा ९५ टक्के),कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा ( विज्ञान ९१
टक्के,कला शाखा ८८ टक्के), श्री विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव
बोडखा (कला शाखा १०० टक्के) ,श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कडा (
विज्ञान शाखा ९५ टक्के,कला शाखा ८० टक्के ,वाणिज्य शाखा ८९ टक्के), जोगेश्वरी
माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव (जो.) (कला शाखा १०० टक्के), आनंदराव धोंडे
कनिष्ठ महाविद्यालय कडा ( विज्ञान शाखा ९३ टक्के,कला शाखा ७४ टक्के), इंदिरा कन्या
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव ( कला शाखा ९० टक्के), पंडित जवाहरलाल
नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी ( विज्ञान शाखा ९९ टक्के, कला शाखा
८० टक्के , एमसीव्हिसी शाखा ८६ टक्के),भगवान कनिष्ठ महाविद्यालय आष्टी (विज्ञान
शाखा ७५ टक्के, कला शाखा ८७ टक्के,वाणिज्य शाखा ८० टक्के), यशवंतराव चव्हाण
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालाय पोखरी (कला शाखा ९१ टक्के),पिंपळेश्वर माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा ( कला शाखा ९२ टक्के), श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालय मातकुळी (कला ९१ टक्के ), ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय देऊळगाव घाट ( कला शाखा ९६ टक्के), हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालय घाटा पिंप्री (कला शाखा ७६ टक्के), निकाल लागला आहे.या उत्तीर्ण
विद्यार्थ्यांंचे संस्थेचे संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,संचालक डाॕ.अजय धोंडे,
अभय धोंडे, प्रशासन अधिकारी डाॕ.डी.बी.राऊत, प्रा.शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे,
माऊली बोडखे, संजय शेंडे, प्राचार्यांनी अभिनंदन केले. ----------------- आष्टीच्या
पंडित जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम -----------------
फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल
नुकताच जाहिर झाला आहे. आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू ज्युनियर कॉलेजचा विज्ञान
शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९० टक्के तर एचएससी व्हॉकेशनलचा निकाल
८७ टक्के लागला असून शाखा निहाय गुणानुक्रमे प्रथम,द्धितीय व त्तीय विदयार्थी पुढील
प्रमाणे विज्ञान शाखा रायकर तेजस ९१.८३ टक्के,कु. धोंडे अक्षता राजेंद्र
८६.३३टक्के,कु. गोसावी शर्वरी चंद्रकांत ८४.८३ टक्के,कु.धोंडे तनिष्का किरण ८४.८३
टक्के कला शाखा,कु.कोकरे सुवर्णा लक्ष्मण ७० टक्के,पवार अस्मिता युवराज ६९.१७
टक्के, मांडकर रोहन राम ६५ टक्के एचएससी व्होकेशनल अॕटो १. धस रेखा बलभिम ७३ टक्के
प्रथम अकाउटींग अॕण्ड ऑडिटिंग,भवर सुनिता भाउसाहेब ७२ टक्के प्रथम या सर्व यशस्वी
विदयार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अजयदादा धोंडे व प्रशासन अधिकारी
डॉ.डी.बी.राऊत, प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे,प्राचार्य सुरेश
बोडखे,उपप्राचार्य सुनिल भवर व सर्व प्राथ्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी वर्ग
आदिंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ------------------
0 टिप्पण्या