
आष्टी (प्रतिनिधी)
४० सेल्सीअंश पेक्षाही जास्त उन्हाचा तापमानाचा कडाका पडल्याने
पशु पक्षी प्राण्यांचा जीव कासावीस होत आहे. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण
झालेले असतानाच मुक्या प्राण्यांसाठी धावून येत मोफत पाण्याचे कुंड ठेवून सेवा
देणारे आणि खऱ्या अर्थाने या प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे विधिज्ञ रत्नदीप
निकाळजे यांच्या कर्तव्य भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.आष्टी येथील प्रसिद्ध
विधीज्ञ रत्नदीप निकाळजे यांनी आष्टीच्या स्व.अनिल भैय्यानगर मध्ये सुमारे २०० लिटर
क्षमतेचे तीन जलकुंड ठेवून मोफत सेवा सुरू केलेली आहे.विशेष म्हणजे दररोज सकाळ,
दुपार आणि संध्याकाळ असे तीनही वेळी हे जलकुंड पाण्याने पुन्हा पुन्हा भरवले
जातात.विधिज्ञ रत्नदीप निकाळजे यांचे वडील स्व. भीमरावदादा निकाळजे यांनी अखंड ३०
वर्ष मोफत पिण्याचे पाणी वाटप केलेले आहे आणि हीच परंपरा जपण्याचे मौलिक कर्तव्य
पुढे जपण्यात आले आहे.आजही पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असताना पिण्याचे पाणी मोफत
वाटप करून मानवी जीवन आणि मनाची कृतज्ञता जपण्यात विधीज्ञ रत्नदीप निकाळजे यशस्वी
झाले आहेत.आष्टीमध्ये मानव,पशु पक्षी प्राण्यांची अत्यंत उन्हाळ्याच्या कडक भयावह
परिस्थितीमध्ये जलसेवक म्हणूनच आज नावलौकिक निर्माण झाला आहे.निस्वार्थ भावनेने
केलेली ही मोफत सेवा मानवी मूल्य जपणारी आहे अशा प्रतिक्रिया जेष्ठ समाजधुरिणांकडून
व्यक्त केल्या जात आहेत.
-----------------
चौकट
--------
संकटकाळात धावून येण्याची
मानवी मनाची सातत्याने तयारी ठेवणारे विधीज्ञ रत्नदीप निकाळजे आष्टीत सामाजिक
बांधिलकीची भावना ठेवून असे उपक्रम निरंतर करतात. यासंदर्भात वरिष्ठ पत्रकार उत्तम
बोडखे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ही कर्तव्य भावना घराण्यामध्ये अखंड ३०
वर्षापासून असल्याने आम्हाला कर्तव्य भावनेतून कृतज्ञता व्यक्त करत आनंद वाटतो आणि
समाधान सुद्धा!'अशी निःसंदिग्ध भावना रत्नदीप निकाळजे यांनी व्यक्त केली.
------------------
0 टिप्पण्या