
आष्टी (प्रतिनिधी)
फक्राबादचे सुपुत्र आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणारे रणजित रावसाहेब राऊत यांना संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथे २९ मार्च रोजी
पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत "युवा शास्त्रज्ञ पुरस्कार" प्रदान
करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री.दत्त बहुउद्देशीय संस्था संचलित
लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जामखेड, यांच्या वतीने विशेष सत्कार करून गौरव
करण्यात आला.यावेळी लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक दत्तात्रय
पांडुरंग लोखंडे व डॉ.क्षीरसागर (एम. एस.ऑर्थो.) यांनी रणजित राऊत यांचे अभिनंदन
करताना सांगितले की, "राऊत यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी
ग्रामीण भागातील विविध समस्यांवर विज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न
केला आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे."रणजित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
सांगितले की, "हा पुरस्कार हा केवळ माझा नाही, तर माझ्या शिक्षकांचा,
मार्गदर्शकांचा, हितचिंतकांचा आणि गावकऱ्यांचा आहे, ज्यांनी नेहमीच माझ्यावर
विश्वास ठेवला.लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जामखेड सोबत असलेली माझी नाळ मला
नेहमीच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते, या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी
वाढली आहे. मला माझ्या पुढील संशोधनासाठी प्रेरणा मिळाली आहे."या कार्यक्रमाला
समाजसेवक जयेश कांबळे,लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक चंद्रमणी
बाळासाहेब घायतडक व मेडिकल चे संचालक ओमासे उपस्थित होते. रणजित राऊत यांच्या या
यशामुळे जामखेड तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
0 टिप्पण्या